BSNL | बीएसएनएलचा धमाका प्लॅन ! 120 दिवसांसाठी 240 GB Data सहित आणखी काही मिळणार सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात मोठी असलेली टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सातत्याने काहीतरी नवी योजना आणत असते. ग्राहकांसाठी उपयुक्त अशी आणि ऑफरमध्ये नवा प्लॅन जारी करत असते. तर सध्या या कंपनीने ग्राहकांना प्रोत्साहन करण्यासाठी स्वस्तात मस्त प्रीप्रेड प्लॅन ( BSNL Prepaid Plans) लॉन्च केला आहे. 666 रुपयांच्या या प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटासोबतच मोफत कॉलिंग, दररोज 100 SMS अशा विविध सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. कमी पैशात अधिक डेटासहित आणखी काही सुविधा मिळणार आहे. तर या प्लॅनमध्ये यूजर्सना 2 GB Data मिळणार आहे.

BSNL | bsnl plan for customers with 240 gb of data for 120 days and more read in details

काय आहे BSNL चा प्लॅन?

बीएसएनल च्या 666 रुपयांच्या प्लॅनला 120 दिवसांची वैधता (Validity) आहे. तर जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्हीआय (Vi) या कंपन्यांचे प्लॅन हे 28, 56, 84, 180 नंतर थेट 365 दिवसांपर्यंतच्या वैधतेचे आहेत. बीएसएनल अशी कंपनी आहे की, जी 90 आणि 120 दिवसांपर्यंत वैधतेचे प्लॅन देत आहे.

‘या’ प्लॅनचा फायदा काय?

बीएसएनल च्या या प्रीपेड प्लॅनसोबत (Prepaid Plans)) 120 दिवसांच्या वैधतेसोबतच रोज 2 GB Data अर्थात एकूण 240 GB Data मिळतो. समजा जर ग्राहकाला अधिक डेटा असलेल्या प्लॅनच्या शोधात असेल, तर BSNL चा हा प्लॅन ग्राहकांसाठी उपयुक्त आणि सोयीस्कर आहे. हा एक चांगला पर्याय म्हणजे, याशिवाय सर्व नेटवर्कवर Unlimited Calling, रोज 100 SMS सुविधा मिळणार आहे. म्हणून, ग्राहकांसाठी हा प्लॅन कमी पैशात अधिकाधिकक सुविधा देणारा आहे.

Jio 599 रुपयांचा प्लॅन –

याव्यतिरिक्त Jio कंपनी देखील ग्राहकांना भन्नाट प्लॅन देते आहे. यात 2 GB Data मिळतो. तसेच
या प्लॅनची वैधता 84 दिवसाची आहे. अर्थात यात 168 GB data दिला आहे. याचबरोबर सर्व
नेटवर्कवर Unlimited Calling, दररोज 100 SMS, दिले आहे. दरम्यान, Jio अ‍ॅप्सच्या (Jio
app) मोफत सबस्क्रिप्शनची सुविधा देखील या प्लॅनमध्ये दिली आहे.

हे देखील वाचा

Covid 19 | केंद्राने मुख्य सचिवांना पाठवला संदेश, वाढत्या प्रकरणांबाबत रहा अलर्ट; सणासुदीत Lockdown लावण्यासाठी करू नये ‘संकोच’

Amruta Fadnavis | महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? ‘या’ हटक्या शैलीत अमृता फडणवीसांचं उत्तर (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  BSNL | bsnl plan for customers with 240 gb of data for 120 days and more read in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update