BSNL ने दिला Jio-Airtel-Vi ला जबरदस्त धक्का! कमी किमतीत 28 दिवसापर्यंत रोज मिळवा 2GB डेटा आणि भरपूर काही

नवी दिल्ली – BSNL ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे जी Jio, Airtel आणि Vodafone Idea किंवा Vi ला एकटी टक्कर देत आहे. BSNL ने असा एक प्रीपेड प्लॅन आणला आहे जो ग्राहकांना आश्चर्यकारक फायदे देत आहेत, हे फायदे Jio, Airtel, Vi च्या ग्राहकांना त्याच श्रेणीच्या प्लॅनमध्ये मिळत नाहीत. या एका प्लॅनमधून BSNL ने Jio, Airtel, Vi ला कसा धक्का दिला आहे ते सविस्तर जाणून घेवूयात…

 

BSNL चा जबरदस्त प्रीपेड प्लॅन

बीएसएनएलच्या 187 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी दररोज 2GB हायस्पीड इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळत आहेत. मात्र, या प्लानची दैनंदिन डेटा मर्यादा संपली तर इंटरनेट स्पीड 80Kbps पर्यंत कमी होईल.

 

Jio प्रीपेड योजना

याच किमतीच्या श्रेणीमध्ये Jio 28 दिवसांसाठी प्रीपेड प्लॅन देखील ऑफर करते. 209 रुपयांच्या या प्लॅनमध्ये, Jio ग्राहकांना दररोज 1GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS असे फायदे मिळतात. या प्लानची किंमत देखील Airtel पेक्षा जास्त आहे आणि दैनंदिन डेटा देखील कमी आहे.

 

एअरटेल प्रीपेड प्लॅन

एअरटेलचा 179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये Airtel यूजर्सना 28 दिवसांसाठी एकूण 2GB डेटा देत आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळत आहे.

 

या प्लॅनचा आणखी फायदा म्हणजे Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनमध्ये प्रवेश. जरी हा प्लान BSNL पेक्षा स्वस्त असला आणि OTT चा फायदा देखील मिळत असला, तरी BSNL दररोज 2GB डेटा देत असताना, Airtel च्या प्लॅनमध्ये एकूण फक्त 2GB इंटरनेट मिळत आहे.

 

Vi ची प्रीपेड योजना

Airtel प्रमाणे, Vi च्या प्रीपेड प्लॅनची किंमत 179 रुपये आहे.
या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सला 28 दिवसांसाठी 2GB डेटा,
कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देत आहे.
हा प्लॅन बीएसएनएलपेक्षा स्वस्त असू आहे, परंतु यामध्ये यूजर्सला रोजच्या डेटाची सुविधा मिळत नाही.

 

Web Title :- BSNL | bsnl rs 187 prepaid plan better than same range plans of jio airtel vi benefits compared

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा