बदलला BSNL चा हा प्लॅन, आजपासून रोज मिळेल 1GB च्या ऐवजी 2GB डेटा

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडून (BSNL) 499 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये बदलाची घोषणा करण्यात आली आहे. हा बदल देशभरात आज म्हणजे 1 जून 2021 पासून लागू होईल. अशावेळी या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज जास्त डेटाचा फायदा मिळेल. सोबतच बीएसएनएलकडून (BSNL) जास्त डेटासाठी या प्लॅनच्या इतर सुविधांमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. अशावेळी बीएसएनएल यूसर्जना आजपासून 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1जीबीच्या ऐवजी रोज 2जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेवूयात –

बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्लॅन
टेक वेबसाइट ओन्ली टेकच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अजूनपर्यंत यूजर्सला 1जीबी डेटा ऑफर केला जात होता. परंतु आजपासून बीएसएनएलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज 2जीबी डेटा ऑफर केला जाईल. याशिवाय यूजर्सला या प्लॅनमध्ये पहिल्या प्रमाणेच अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येईल. जो विशेषकरून दिल्ली आणि मुंबईसाठी असेल. तर रोज 100एसएमएसची सुविधा मिळेल. याशिवाय झींग म्यूझिकचे मोफत सबस्क्रीप्शन मिळेल.

मात्र, जर तुम्ही 31 मे च्या अगोदर बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्री-पेड प्लॅन रिचार्ज केला आहे, तर रोज 2जीबी डेटाचा फायदा मिळणार नाही. 31 मे च्या अगोदरच्या रिचार्जवर पहिल्या प्रमाणे 1जीबी डेटाच मिळत राहील.

 

Also Read This : 

भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

 

‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या

 

सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा

 

आशिष शेलारांनी मुंबई पोलिका निवडणुकीसाठी शिवसेनेला दिलं ‘आव्हान’, म्हणाले – ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी…भाजप तयार’