फायद्याची गोष्ट ! BSNL नं सुरू केले पुन्हा ‘खास’ प्लॅन, वर्षभर दररोज 3 GB डाटा आणि ‘या’ सुविधा मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)नं पुन्हा एकदा आपला जुना प्लॅन सुरू केला आहे. कंपनीनं ग्राहकांसाठी 1999 चा प्लॅन पुन्हा सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी हा प्लॅन बंद करण्यात आला होता. याशिवाय कंपनीनं इतरही काही नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. टेलिकॉमटॉकच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएलचा 1999 चा प्रीपेड प्लॅन पुन्हा सुरु झाला आहे.

‘या’ प्लॅनमध्ये मिळणार ‘हे’ फायदे
या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 250 मिनिटांचं फ्री कॉलिंग (दिल्ली आणि मुंबईचा समावेश) मिळणार आहे. याशिवाय रोज 3 जीबी डेटाही मिळणार आहे. या FUP डेटानंतर ग्राहक डेटाचा वापर 80kbps च्या स्पीडनं करू शकतात. याशिवाय ग्राहकांना PRBT आणि 365 दिवसांसाठी SonyLIV सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.

97 वाला प्रीपडे प्लॅन पुन्हा लाँच
या प्लॅन व्यतिरीक्त BSNLनं 97 रुपयेवाला प्रीपेड प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. यात ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा आणि रोज 250 मिनिटं कॉलिंगसाठी मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 18 दिवसांची आहे. 998 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना 240 दिवसांसाठी रोज 2 जीबी डेटा मिळत आहे.

365 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर यात ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. परंतु बाकी फायदे केवळ 60 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी मिळणार आहे. BSNL च्या दुसऱ्या 997 च्या प्रीपेड प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर ग्राहकांना रोज 3 जीबी डेटा आणि रोज 250 मिनिटे कॉलिंगसाठी मिळणार आहेत. याची व्हॅलिडिटी 180 दिवस आहे.

399 च्या प्लॅनचे फायदे
कंपनीनं 399 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 80 दिवस व्हॅलिडिटी रोज 1जीबी डेटा आणि रोज 100 एसएमएस फ्री PRBT मिळेल.

Visit : Policenama.com