खुशखबर ! BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300 GB डेटा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे. बीएसएनएलने आपल्या ४९९ रुपयांच्या ब्रॉडब्रँड प्लॅनची उपलब्धता ९ सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविली आहे. ‘300GB Plan CS337’ असं या प्लॅनचे नाव असून, हा प्लॅन १० जून रोजी संपणार होता. मात्र, ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने या प्लॅनची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएसएनएलचा ‘300GB Plan CS337 हा प्लॅन कोलकाता, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या भागात उपलब्ध असून, या प्लॅन मध्ये ३०० जीबी डेटा मर्यादेपर्यंत ४० एमबीपीएसचा स्पीड देण्यात आला आहे. मर्यादा संपल्या वरती हा स्पीड १ एमबीपीएस पर्यंत कमी होतो. विशेष म्हणजे, या प्लॅन मध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगची ऑफर देण्यात आली आहे.

याच प्रकारचा एक प्लॅन बीएसएनएल कडून ओडिशामध्ये देण्यात आला आहे. ओडिशामध्ये हा प्लॅन ‘Bharat Fiber 300GB CUL CS346’ या नावाने उपलब्ध असून, मासिक ६०० रुपयांच्या या प्लॅन मध्ये ३०० जीबी डेटा ४० एमबीपीएसच्या स्पीडने देण्यात आला आहे. या प्लॅनची ऑफर ओडिशामध्ये २७ जुलैपर्यंत करण्यात आली आहे.

बीएसएनएलचा ‘300GB Plan CS337’ हा प्लॅन जरी कोलकाता, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या तीन भागा पुरता मर्यादित असला, तरी कंपनीच्या ४९९ रुपयांचा प्लॅन देशातील अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. या ४९९ रुपयांच्या स्टॅंडर्ड प्लॅनमध्ये २० जीबीपीएसच्या स्पीडने १०० जीबी डेटा देण्यात आला आहे. कंपनीची ही ऑफर २९ जूनपर्यंत उपलब्ध असेल.