BSNL चा ‘हा’ प्लॅन आता आणखी 90 दिवसांसाठी उपलब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या 1,188 रुपये वाल्या प्लॅनला 21 जानेवारी, 2020 पर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रीपेड प्लॅनला जुलैमध्ये लॉंच करण्यात आले होते. सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएल ने या प्लॅनला 90 दिवसांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा प्लॅन चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये सुरु करण्यात आलेला आहे. या प्लॅनमध्ये 345 दिवसांची वैधता मिळते. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये बीएसएनएलचा 1,149 रुपयांचा प्लॅन सुरु आहे जो की 1,188 रुपया प्रमाणेच आहे.

1,188 रुपयांचा मरुथम प्रीपेड प्लॅन वर्षाच्या सुरुवातीला चालू केला होता. या प्लॅनमध्ये होम सर्कल आणि नेशनल रोमिंगमध्ये रोज 250 मिनिटांचे कॉलिंग मिळते. नॅशनल रोमींगमध्ये दिल्ली आणि मुंबईचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 5GB इंटरनेट डेटा आणि 1,200 एसएमएस मिळतात. 345 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन केवळ चेन्नई आणि तामिळनाडूसाठी आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगणा सारख्या दुसऱ्या राज्यांमध्ये कंपनीने 1,149 रुपयांचा प्लॅन दिलेला आहे. ज्यात 250 मिनिटांचे कॉलिंग आणि 12GB इंटरनेट डेटा आणि 1,000 एसएमएस देण्यात आलेले आहेत.

Visit : Policenama.com