फायद्याची गोष्ट ! फक्त 96 रूपयात मिळवा दररोज 10 GB डाटा, जाणून घ्या ‘ऑफर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणले आहेत. यामध्ये दोन प्रीपेड प्लॅन असून ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी हे प्लॅन अंत्यंत फायदेशीर असून ९६ रुपये आणि २३६ रुपयांचे दोन प्रीपेड प्लॅन आहेत.

९६ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांचा कालावधी मिळत असून २३६ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांचा कालावधी मिळतो. इतर कंपन्यांच्या तुलनेत ९६ रुपयाचा प्लॅन फार फायदेशीर असून यामध्ये तुम्हाला दरदिवशी १० जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला महिन्याला २८० जीबी डेटा मिळणार आहे. तर २३६ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४० जीबी डेटा मिळणार आहेत. मात्र या प्लॅनमध्ये तुम्हाला मेसेजिंग आणि कॉलिंगची सुविधा मिळणार नसून फक्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. सध्या हे दोन प्लॅन फक्त महाराष्ट्रात उपलब्ध असून लवकरच इतर राज्यात देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणले होते. यामध्ये ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन देखील एका वर्षासाठी मोफत दिले जाणार होते. यामध्ये तुम्ही अमेझॉन प्राइमवर उपलब्ध असणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकणार होते.

आरोग्यविषयक वृत्त –