BSNL नं केली मोठी घोषणा, आता 4 महीने फ्री मिळणार ‘ही’ सेवा, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड ( BSNL) चे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. बीएसएनएल देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील मोबाईल धारकाला कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा पुरवत आहेत. सध्या टेलिकॉम जगतात मोठी स्पर्धा असून देखील बीएसएनएल सध्या आपले ग्राहक टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

बीएसएनल आपल्या ग्राहकांना सहा पैसे प्रती पाच मिनिटे या दराने सेवा देणार आहे आणि लॅण्डलाइनच्या माध्यमातून कॉलिंग केल्यास ग्राहकांना कॅशबॅक देखील देत आहे. बीएसएनएल ग्राहक जे त्यांच्या वार्षिक कनेक्शनसाठी किंवा जास्त सदस्यता कालावधीसाठी आगाऊ पैसे देतात त्यांना बीएसएनएल कडून कित्येक महिन्यांची विनामूल्य सेवा मिळणार आहे जाणून घेऊयात नक्की कशा प्रकारची आहे ही ऑफर

बीएसएनएल ब्रॉडबँड लॉंग टर्म सब्सक्रिप्शनचा फायदा
या ऑफरनुसार बीएसएनएल आपल्या ग्राहकांना चार महिन्याच्या भांड्यातून मुक्ती देत आहे. तुम्ही किती कालावधीसाठी प्लॅन घेतला आहे त्यावरून हे ठरेल की तुम्हाला किती रुपये भाड्यामध्ये सूट मिळेल. उदा – बीएसएनएल ने नोट केले आहे की, जे ग्राहक आपल्या ब्रॉडबँड DSL, BharatFibre, BBoWi-Fi प्लॅन किंवा लँडलाईन प्लॅनच्या बारा महिन्यांसाठी लगेच पेमेंट करतात त्यानं एका महिण्यासाठी मोफत सेवा मिळेल. म्हणजेच बारा महिन्यनसाठीचे चार्जेस दिल्यानंतर त्यांना एकूण तेरा महिण्यासाठी सेवा मिळणार.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like