खुशखबर ! BSNL कडून 4G सेवा लॉन्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली असून कंपनीने 4G सेवा लाँच केली आहे. कर्नाटक आणि केरळनंतर आता आंध्र प्रदेशमध्ये कंपनीने 4G सेवा लाँच केली आहे. त्यामुळे आता या राज्यातील लोकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. बीएसएनएलचे आंध्र प्रदेशातील विभागीय मुख्य मॅनेजर ए. पी. राव यांनी आज यासंदर्भातील घोषणा केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, दिवसेंदिवस आमचे ग्राहक वाढत असून आम्ही देखील ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आंध्रप्रदेशात साडेतीनशे 4G टॉवर्स उभारण्यात उभारण्यात येणार आहे. यासाठी कंपनी जवळपास २०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना मोठया प्रमाणात फायदा होत असून मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वपर वाढल्याची माहिती देखील राव यांनी दिली.

दरम्यान, कंपनीने या निर्णयानंतर आणखी १५० टॉवर्स उभारण्याची योजना आखली असून जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत एकूण १७ हजार ब्रॉडबँड कनेक्शन दिले असल्याची माहिती देखील बीएसएनएलच्या वतीने देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like