‘BSNL’चा ३६५ दिवसाची ‘व्हॅलिडीटी’ असलेला ‘सुपरडूपर’ प्रिपेड प्लॅन लॉन्च, मिळणार दररोज १.५ GB ‘डाटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – BSNL तोट्यात असले तरी कंपनीकडून ग्राहक टिकण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचसाठी कंपनीेने आता नवा कोरा प्लॅन बाजारात आणला आहे. BSNL चा हा नवा प्लॅन प्रीपेड असणार असून त्याची किंमत १३४५ रुपये असेल. यात ग्राहकाला संपुर्ण एका वर्षांची वैधता असेल. म्हणजे हा प्लॅन ग्राहकांसाठी सर्व ३६५ दिवस असेल.

असा असेल प्लॅन –

BSNL ने दिलेल्या या प्लॅनच्या रिचार्जची वैधता ९ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. हा प्लॅन फक्त केरळ सर्कल पर्यंत उपलब्ध आहे. याच बरोबर हा फक्त डेटा प्लॅन असणार आहे. यात कोणत्याही प्रकारचे फ्री कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा नसेल. तर डेटा, १.५ जीबी हाय स्पीड डाटा देण्यात येणार आहे. याच बरोबर BSNL १० जीबी डाटा देण्यात येणार आहे. ज्याला १.५ जीबी प्रतिदिवसाचे लिमिट संपल्यावर वापरता येईल. एकूण मिळून यात ५५७.५ जीबीचा डेटा देण्यात येणार आहे.

BSNL चा आभिनंदन प्लॅन –

कंपनीने नुकताच १५१ रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता. BSNL चा हा प्लॅन १८० दिवसांसाठी वैध आहे. हा प्लॅन सब्सक्राइब केल्यानंतर अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग मिळेल. अनलिमिटेड कॉलिंग सुविधा ही मुंबई आणि दिल्ली रोमिंगच्या दरम्यान उपलब्ध असेल. यात डाटा- एसएमएस- कॉलिंग या सुविधा फक्त २४ दिवसांसाठी असतील. परंतू प्लॅनची वैधता १८० दिवस असेल. म्हणजेच तुम्ही १८० दिवस विना कोणत्याही रिचार्ज शिवाय इनकमिंग कॉल रिसीव्ह करु शकतात.

 

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा

आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर… : नितेश राणे

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें

Video : BF सोबत ‘एन्जॉय’ करतेय अभिनेता आमिर खानची मुलगी इरा, पहा तिचा ‘भन्‍नाट’ डान्स

अभिनेत्री प्राजक्ता माळीला ठाणे कोर्टाकडून दुसरं ‘समन्स’

 

You might also like