फायद्याची गोष्ट ! BSNL च्या ‘या’ प्लानमध्ये तब्बल 600 दिवसांपर्यंत ‘फ्री कॉलिंग’, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार फायदा मिळणार असून, या प्लॅनची किंमत २३९९ रुपये आहे. या नव्या प्लॅनची खासीयत ही आहे की या प्लॅनद्वारे ग्राहकांना ६०० दिवसांची वैधता मिळणार आहे. सध्याच्या स्थितीला मार्केटमध्ये इतकी मोठी वैधता देणारा दुसरा कोणताही प्लॅन अद्याप उपलब्ध नाही. मात्र, यात कोणताही डेटा बेनिफिट मिळणार नाही. अर्थात ज्या ग्राहकांना डेटाची गरज नाही. त्यांच्यासाठी हा प्लॅन लाभदायक ठरू शकतो.

काय मिळणार प्लॅनमध्ये?

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ६०० दिवसांची (२० महिन्यांची) वैधता मिळणार आहे. या प्लॅनमधून ग्राहकांना ६०० दिवस अनलिमिटेड कॉलिंगची मजा घेता येऊ शकते. तसेच यामध्ये कंपनी कोणताही डेटा बेनिफिट देत नसून, दररोज १०० एसएमएस मिळण्याची सुविधा मात्र ग्राहकांना दिली आहे. सर्वात मोठी वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये २५० मिनिट डेली FUP सोबत येतो.

जीओचा २३९९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळत असून, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर इतर नेटवर्कच्या कॉलिंगसाठी १२००० नॉन जिओ मिनिट्स मिळतील.

भारती एअरटेलचा २३९८ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनची किंमत २३९८ रुपये आहे. या प्लॅनची वैधता ३६५ दिवस आहे. तसेच सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. तर दररोज १.५ जीबी डेटा मिळतो.

व्होडाफोनचा २३९९ रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन एअरटेल सारखा असून, यामध्ये दररोज ३६५ दिवस १.५ जीबी डेटा दिला जातो. तसेच सर्व नेटवर्कवरती अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि १०० एसएमएस मिळतात. जर तुम्हास जास्त कॉलिंग पाहिजे असेल तर तुम्ही एअरटेल किंवा व्होडाफोन यापैकी एक प्लॅन निवडू शकता. पण तुम्हाला डेटा जास्त हवा असेल तर जीओचा प्लॅन चांगला ठरू शकतो.