BSNL Monthly Recharge Plan | खुशखबर! आता केवळ 19 रुपयात महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, या टेलिकॉम कंपनीने लाँच केला नवीन प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL Monthly Recharge Plan | गेल्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी योजना महाग केल्या होत्या. यानंतर सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवणेही महाग झाले. परंतु, आता केवळ 19 रुपयांच्या दरमहा रिचार्जवर मोबाइल क्रमांक सक्रिय ठेवता येणार आहे. (BSNL Monthly Recharge Plan)

 

याबाबत बीएसएनएलने 19 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनसह, सिम 30 दिवस सक्रिय ठेवता येईल. तर Jio, Airtel, Vodafone Idea च्या सिम अ‍ॅक्टिव्हसह स्वस्त प्लॅनची रेंज 50 ते 120 रुपयांपर्यंत आहे.

 

मात्र, हे प्लान 4जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह येतात. तर बीएसएनएल 3जी कनेक्टिव्हिटी देते. वृत्तानुसार, BSNL चे 4जी नेटवर्क 15 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. पण, जर तुम्हाला फक्त नंबर अ‍ॅक्टिव्ह ठेवायचा असेल, तर 19 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वोत्तम आहे.

 

BSNL च्या 19 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार्‍या फायद्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. बीएसएनएलच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. कंपनीने या प्लानला VoiceRateCutter_19 असे नाव दिले आहे. या रिचार्जसह, ऑन-नेट आणि ऑफ-नेट कॉल दर 20 पैसे प्रति मिनिट होतो.

91mobiles ने याबाबत माहिती दिली आहे.
BSNL च्या या प्लॅनसह, जरी यूजरकडे कोणताही डेटा प्लॅन किंवा बॅलन्स नसेल तरीही त्याचा नंबर सक्रिय राहील.
यासह, त्यांना सर्व सेवा आणि इन्कमिंग कॉल सुविधा मिळत राहतील.

 

जर या प्लॅनचे कॅलक्युलेट केले तर या प्लॅनमधून तुम्हाला वर्षभरासाठी फक्त 19 * 12 = 228 रुपये खर्च करावे लागतील.
म्हणजेच फक्त 228 रुपयांमध्ये तुमचे बीएसएनएल सिम वर्षभर अ‍ॅक्टिव्ह राहील.
हा प्लॅन व्हॉईस व्हाउचर प्लॅनमध्ये बीएसएनएल वेबसाइटवर लिस्ट केला आहे.

 

Web Title :- BSNL Monthly Recharge Plan | BSNL rs 19 monthly recharge plan to keep your mobile number active

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC | 8 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत मिळवा 50 लाखापेक्षा जास्त रिटर्न, फायद्याचा सौदा आहे LIC चा ‘हा’ प्लान

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या 34 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, जाणून घ्या

 

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले…