BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! कंपनीकडून ‘ही’ नवी सुविधा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बीएसएनएलने (BSNL) आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी शुक्रवारी मल्टिपल रिचार्ज सुविधा लाँच केली आहे. या सुविधेमार्फत BSNL प्रीपेड ग्राहक आपला सध्याचा प्लॅन संपण्यापूर्वी अडवॉन्समध्ये रिचार्ज करु शकेल. ही नवी सुविधा बीएसएनएलच्या प्रीपेड व्हावचर (PV) आणि स्पेशल टॅरिफ व्हावचर (STV) यावरती उपलब्ध आहे. याची सुरुवात किंमत ९७ रुपयांपासून ती १९९९ रुपयांपर्यंत आहे.

बीएसएनएलचे नवे प्रीपेड प्लॅन ९७ रुपये, ९८ रुपये, ११८ रुपये, १७८ रुपये, २४७ रुपये, ३१९ रुपये, ३९९रुपये, ४२९ रुपये, ४८५ रुपये, ६६६ रुपये, ६९९ रुपये, ९९७ रुपये, १६९९ रुपये आणि १९९९ रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामार्फत तुम्ही अडवॉन्स रिचार्ज करता येणार आहे. यासंदर्भात टेलिकॉम कंपनीने सांगितले की, एक मेसेज पाठवून आपल्या ग्राहकांना या सुविधेची माहिती मिळणार आहे. देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये बीएसएनएलची ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

ज्याप्रमाणे रिलायन्स जिओ युजर्स आपल्या प्लॅनसाठी अडवॉन्स पेमेंट करु शकतात. एअरटेलनेही आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मल्टिपल टाइम साठी अकाउंटला रिचार्ज करण्याची सुविधा दिली आहे. त्याचप्रमाणे बीएसएनएलची मल्टिपल रिचार्ज पद्धती काम करते. सरकारी टेलिकॉम कंपनीने नुकतेच ९४ रुपये आणि ९५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ३ जीबी हायस्पीड डेटा आणि १०० व्हाईस कॉलिंग मिनिट देण्यात आली आहे. ऑपरेटरने नुकताच ४९९ रुपयांचा ब्रॉडब्रँड प्लॅन देखील लाँच केला आहे. ज्यामध्ये १०० जीबी डेटा 20Mbps स्पीडने मिळतो.