खुशखबर ! BSNLकडून ग्राहकांना अमेझॉनची प्राइम मेंबरशीप ‘एकदम’ फ्री, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमधून समोर आले कि, बीएसएनएल आपल्या ग्राहकांना ४९९ च्या प्लॅनवर Amazon Prime मेंबरशिप देत आहे. बीएसएनएलची हि ऑफर नवीन आणि वापरात असलेल्या दोन्ही ग्राहकांना मिळणार आहे. याआधी हि ऑफर केवळ ७४५ च्या प्लॅनवरच मिळत होती. मात्र हि ऑफर फक्त ब्रॉडबँड ग्राहकांनाच देत असून प्रीपेड वापरणाऱ्या ग्राहकांना हि सुविधा मिळणार नाही. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभराचा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना कंपनी २५ टक्के कॅशबॅक देखील देत आहे. त्याचबरोबरच वार्षिक लँडलाईनवर देखील कॅशबॅक देण्यात येत आहे.

Amazon Prime मेंबरशिप बरोबरच प्राइम वीडियो, प्राइम म्यूजिक आणि प्राइम रीडिंग या सेवा देखील मोफत मिळत आहेत. मात्र यासाठी ग्राहकांना १२ महिन्याचा ब्रॉडबँड प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. प्राईम मेंबरशिपबरोबरच ग्राहकांना ४९९ पेक्षा कमी प्लॅनवर १५ टक्के कॅशबॅक, ४९९ ते ९०० रुपयांच्या प्लॅनवर २० टक्के कॅशबॅक तर ९०० रूपांपेक्षा मोठ्या प्लॅनवर २५ टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या आगोदर कंपनी ३९९ रुपयाच्या प्रीपेड प्लॅनवर Amazon Prime मेंबरशिप मोफत देत होती.

दरम्यान, बीएसएनएलच्या वेबपेजवर या संदर्भात ऑफर दिसत असून तुम्ही यासंदर्भात कंपनीशी चौकशी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like