BSNL चा भन्नाट प्लॅन ! 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज 3GB डेटा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बीएसएनएलकडे आता एक प्रीपेड प्लॅनही आहे. ज्यात २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत युजर्सना दररोज 3GB डेटा वापरण्यास मिळतो. बीएसएनएलकडे आपल्या युजर्ससाठी परवडणाऱ्या किंमतीतील अनेक प्लॅन्स आहेत. बीएसएनएल व्यतिरिक्त रिलायन्स जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन-आयडियाकडेही दररोज 3जीबी डेटा देणारे प्लॅन आहेत. मात्र, त्यांची किमान किंमत ३०० रुपयांपेक्षा जास्त आहे.

रिलायन्स जिओकडे ३४९ रुपयांपासून दररोज 3 जीबी डेटा देणारे प्लॅन्स सुरू होतात. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे ३९८ रुपयांपासून दररोज ३ जीबी डेटा प्लॅनची सुरूवात होते.

बीएसएनएलचा २४७ रुपयांचा प्लॅन :-

सध्या कंपनीच्या वेबसाइटवर एक प्रमोशनल ऑफर सुरू आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी या प्लॅनसाठी ३० दिवसांऐवजी ४० दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. कंपनीची ही ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंतच वैध आहे. युजर्सना अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी दररोज 250 एफयूपी मिनिटेही दिली जातात. या प्रीपेड प्लॅनमध्ये सामान्यपणे युजर्सना 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटासोबत १०० SMS मिळतात. डेटामर्यादा संपल्यानंतर ८० Kbps या कमी इंटरनेट स्पीडने डेटा वापरता येतो.