BSNL ची भन्नाट ऑफर ! 4 महिन्यापर्यंत इंटरनेट सेवा फ्री

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – देशातील खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने नवीन-नवीन प्लान आणायला सुरुवात केली आहे. खासगी कंपन्यांनी ऑफर जाहीर केल्यानंतर बीएसनएलनने देखील आपल्या युजर्संसाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणत आहे. आता पुन्हा एकदा बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे. बीएसएनएलच्या ब्रॉडबँड युजर्संना 4 महिन्यांपर्यंत फ्री सर्विस ऑफर केली आहे. या जबरदस्त ऑफरचा फायदा भारत फायबर ब्रॉडबँड युसर्संसोबत लँडलाईन ब्रॉडबँड आणि  Wi-Fi Max ब्रॉडबँड युजर्संना दिला जात आहे.

या ऑफर अंतर्गत सर्वजण याचा फायदा घेऊ शकतात जे बीएसएनएलच्या 36 महिने चालणाऱ्या कोणत्याही प्लानला स्बस्क्रायबर्स करतील. कंपनीकडे अन्य लॉंग टर्मचे प्लानसुद्ध आहेत. यात चार महिन्यांपर्यंत फ्री सर्विसची ऑफर दिली जात नाही. जाणून घ्या बीएसएनएलच्या ऑफर्स…

‘या’ प्लानमध्ये मिळतो फ्री सर्विसचा फायदा
बीएसएनएलच्या भारत ब्रॉडबँड आणि अन्य ब्रॉडबँड कनेक्शन सोबत एकाहून अधिक जास्त लाँग टर्म प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये दुसरे अनेक फायदे मिळत आहेत. 12 महिन्याच्या या प्लानमध्ये कंपनी एक महिन्याची फ्री सर्विस आणि 24 महिन्यांच्या प्लानमध्ये तीन महिन्यांची फ्री सर्विस देत आहे. जर तुम्ही 36 महिन्याचा प्लान घेतला तर तुम्हाला 40 महिन्यांची सर्विस फ्री मिळणार आहे. म्हणजेच 4 महिने फ्री इंटरनेट सर्विस मिळणार आहे.

36 महिन्याच्या प्लानमध्ये मिळणारे फायदे
BSNL कंपनीचे तुम्ही भारत फायबर ब्रॉडबँड कनेक्शन घेतले असेल तर तुम्हाला त्याच्या सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. जास्त करून या प्लानमध्ये कंपनी  FUPलिमिट पर्य़ंत चांगली अनलिमिटेड डाऊनलोडिंग स्पीड ऑफर करत आहे. BSNL च्या 36 महिन्याचा प्लान हा युजर्संसाठी एक चांगला प्लान असून यासाठी तुमच्याकडे BSNL चे कनेक्शन असणे गरजेचे आहे.

सर्कलनुसार प्लान आणि फायदे यामधील फरक
BSNL कंपनीचे तुम्ही ग्राहक असला तरी तुम्ही कोणत्या सर्कलमध्ये राहता त्याला फार महत्व आहे. BSNLचा कोणता प्लानमध्ये किती डेटा बेनिफिट मिळणार आहे हे प्लानच्या रेंटलवर अवलंबून आहे. BSNL च्या वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळा प्लान आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यात वेगवेगळे बेनिफिट्स मिळतात. प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट आणि किंमत यांच्यात राज्यानुसार कमी- अधिक फरक असतो. कंपनी आपल्या दुसऱ्या प्लान्समध्येही अनेक बेनिफिट देत आहे.

वार्षिक प्लान घेतल्यावर गुगल नेस्ट मिनी
BSNLच्या प्लानच्या सुरुवातील युजर्संना अ‍ॅमेझॉन प्राईमचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात होते. मात्र, आता कंपनीने हे बंद केले आहे. याशिवाय BSNL ने 23 मे पासून एक नवीन ऑफर सुरु केली आहे. BSNL च्या वार्षिक प्लान घेतलेल्या युजर्संना 99 रुपये मंथली ईएमआयवर गुगल नेस्ट मिनी आणि 199 रुपयाच्या ईएमआयवर गुगल नेस्ट हब ऑफर केली जात आहे. BSNLच्या वार्षिक प्लान घेणाऱ्या युजर्संसाठी ही ऑफर देण्यात येत आहे.