खुशखबर : ‘BSNL’चा धमाकेदार ‘प्लॅन’, ग्राहकांना मिळणार Hotstar चे एक वर्षाचे ‘सब्सक्रिप्शन’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सरकारी टेलीकॉम कंपनी BSNLने बाजारात खासगी कंपन्याना टक्कर देण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन आणला आहे. आता सर्वच कंपन्या आपल्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉनचे सब्सक्रिप्शन देत आहे.

मात्र यावर BSNL ने देखील आपला प्लॅन आणला आहे. यासाठी BSNL ने एक नवा फायबर ब्रॉडबँड प्लॉन लॉन्च केला आहे. यात ग्राहकांना हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन देण्यात आले आहे. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांला हॉटस्टॉरचे सब्सक्रिपशन मिळेल.

BSNL ने नव्या SUPERSTAR 300 हायस्पीड फायबर ब्रॉडबॅड प्लॉन लॉन्च केला आहे. ग्राहकांना एका महिन्यासाठी हा प्लॅन उपलब्ध होणार असून 749 रुपयांचा हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 300 GB डेटा मिळणार आहे तसेच यात 50 Mbps चे इंटरनेट मिळणार आहे.

यात काही एडिशनल बेनिफिट देखील मिळणार आहे, जी या प्लॅनची खासियत असणार आहे. तसेच यात सुपरस्टार 300 प्लॅन बरोबर हॉटस्टार सब्सक्रिपशन देण्यात येत आहे. म्हणजेच ग्राहकांना या प्लॅनमध्ये देणात येणारे हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन 1 वर्षासाठी असेल. 1 वर्षासाठी हॉटस्टारचा वापर ग्राहक करु शकतात.

सध्या विश्वचषक चालू असल्याने आधिकााधिक मिळवण्याचा BSNL चा प्रयत्न आहे. कारण मॅच बघण्यासाठी हॉटस्टॉरचा वापर करतात. त्याच ग्राहकांना लक्ष करण्यासाठी BSNL ने हा प्लॅन आणला आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक 18003451500 या क्रमांकावर कॉल करु शकतात.