BSNL नं बदलला 99 रुपयांचा प्लॅन, मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टेलिकॉम कंपन्या वापरकर्त्यांच्या सोयी लक्षात घेऊन चांगल्या सेवा आणि ऑफर देत आहेत. त्याचबरोबर सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलदेखील यात मागे नाही. बीएसएनएल वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी म्हणजे कंपनीने आपल्या 99 रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरमध्ये बदल केले आहेत. आता यामध्ये वापरकर्त्यांना विनामूल्य पर्सनालाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) ऑफर केली जात आहे. म्हणजेच, वापरकर्त्यांना 22 दिवसांसाठी पर्सनालाइज्ड रिंग बॅक टोन सेवा केवळ 99 रुपयात मिळू शकते. या ऑफरबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.

बीएसएनएलची खास ऑफर

बीएसएनएलने आपले 99 रुपयांचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर बदलले आहे. आता युजर्स या प्लॅनमध्ये 22 दिवसांसाठी पर्सनालाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) सेवेचा विनामूल्य लाभ घेऊ शकतात. कंपनी या सेवेसाठी दरमहा 30 रुपये घेते. तसेच निवडलेल्या प्रत्येक गाण्यासाठी तुम्हाला 12 रुपये मोजावे लागतात.

या प्लॅनमध्ये मिळणारे लाभ

99 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये मिळालेल्या फायद्यांविषयी बोलताना यूजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय 22 दिवसांपर्यंत दररोज कॉलिंगसाठी 250 FUP मिनिटेही मिळत आहेत. त्याचवेळी मर्यादा संपल्यानंतर वापरकर्त्यांना कॉल करण्यासाठी बेस टॅरिफ चार्ज भरावा लागेल.

कोणत्या क्षेत्रात उपलब्ध असणार ही ऑफर

बीएसएनएलच्या या ऑफरचा फायदा आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, चेन्नई, दमण आणि दिव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, कोलकाता, लडाख आणि मध्य प्रदेशातील वापरकर्ते घेऊ शकतात. वापरकर्ते कंपनीच्या साइटला भेट देऊ शकतात आणि त्यांच्या क्षेत्रात ही योजना उपलब्ध आहे की नाही ते तपासू शकतात.