सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! BSNL देणार 10% सूट, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आपण सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने ( BSNL) देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना आता BSNL च्या काही सर्व्हिसेसवर 10 टक्के सूट देणार आहे. 1 फेब्रुवारी 2021 पासून ही खास योजना कार्यान्वित केली जाणार आहे. बीएसएनएलने आपला बेस आणखी पक्का करण्यासाठी ही योजना आणल्याचे सांगितले जात आहे.

बीएसएनएलच्या लँडलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर-टू-द-होम यापैकी कोणतीही सर्व्हिस घेतल्यास एकूण रकमेवर 10 टक्के सूट दिली जाणार आहे. आताच्या घडीला सरकारी कर्मचारी असलेले किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. BSNL च्या या खास योजनेसाठी नियम आणि अटी यांमध्ये कोणताही बदल केला नाही.

गेल्या वर्षी सरकारी विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांना BSNL किंवा MTNL चा वापराचे आवाहन केले होते. आपापल्या गरजेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी BSNL किंवा MTNL चे प्लान घ्यावेत, असे सांगितले होते. BSNL आणि MTNL डबघाईला आले असून, अन्य कंपन्यांशी स्पर्धा करणे दोन्ही कंपन्यांसाठी कठीण होत चालले आहे.