BSNL ची भन्नाट ‘ऑफर’ : 9999 रूपयांचे Google प्रोडक्ट फक्त 199 रूपयांत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ऑफर्स आणल्या आहेत. कंपनीने ब्रॉडबँड युजर्ससाठी गूगल नेस्ट मिनी ९९ रुपयांमध्ये आणि १९९ रुपयात प्रति महिना Google Nest Hub ऑफर देत आहे . १८ फेब्रुवारी पासून हि सुरु केलेली प्रमोशनल ऑफर फक्त ९० दिवसांसाठी चालणार आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये लाँच करण्यात आलेली गुगल नेस्ट मिनी ची किंमत ४ हजार ४९९ रुपये होती आणि फ्लिपकार्टवर याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. पहिले ९ हजार ९९९ रुपये इतकी गुगल नेस्ट हबची किंमत होती मात्र ८ हजार ९९९ रुपयात फ्लिपकार्टवर मिळत आहे.आपण दोन्ही प्रॉडक्ट (BSNL)
च्या या ऑफरमध्ये खरेदी केली करू शकते. BSNLच्या ग्राहकांना ७९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्ल्यानच्या वार्षिक सब्सक्रिप्शन घेतील त्यांना या ऑफरचा फायदा होणार आहे.युजर्संना सेकंड जनरेशन स्मार्ट स्पीकर गुगल नेस्ट मिनी खरेदी करायचे असल्यास १२८७ रुपयांचा वन टाइम युसेज चार्ज द्यावा लागणार आहे.

गुगल नेस्ट हब स्मार्ट डिस्प्लेचा स्पीकर आहे. जो ७ इंचाचा टचस्क्रीन पॅनेल, फ्रंट मध्ये EQ Light सेन्सर, दोन फार फील्ड मायक्रोफोन आणि एक फुल रेंज बॅक स्पीकर देण्यात आला आहे. जर तुम्ही या ऑफेरमध्ये घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला २ हजार ५७८ रुपयांचा वन टाइम पेमेंट करावा लागणार आहे. भारत फायबर कस्टमर कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर किंवा BSNLच्या डीएसएल वर अडवॉन्स पेमेंट केल्यानंतर वार्षिक सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. सध्या ही ऑफर चेन्नई मधील BSNLच्या सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध आहे.