BSNL ची जबरदस्त स्कीम ! 425 दिवसांसाठी मिळेल 1275 GB इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि बर्‍याच सेवा फ्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्सव हंगामात खासगी दूरसंचार कंपन्यांना स्पर्धा देण्यासाठी BSNL ने 1,999 रुपयांची प्रीपेड योजना अपडेट केली आहे. या योजनेत ग्राहकांना 1,275 जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळेल. याशिवाय कंपनीने या पॅकची मुदतही वाढविली आहे. या योजनेची वैधता 425 दिवस करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या जबरदस्त योजनेत दररोज 3 जीबी म्हणजेच 425 दिवसांमध्ये एकूण 1275 जीबी डेटा उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसही उपलब्ध असतात आणि कॉल करण्यासाठी 250 मिनिटे दिली जातात.

विनामूल्य मिळतात हे फायदे :
या योजनेत, आपल्याला 2 महिन्यासाठी Eros Now चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यासारख्या प्रमुख खासगी दूरसंचार कंपन्यांनीही आपल्या ग्राहकांना अशा ऑफर दिल्या आहेत.

अलीकडेच बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांना आणखी एक भेट दिली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार 21 ऑक्टोबरपासून वापरकर्त्यांना 135 रुपयांच्या दरात अधिक लाभ मिळतील. बीएसएनएलच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत वापरकर्त्यांना 135 रुपयांच्या रिचार्जसह दुसर्‍या नेटवर्कशी बोलण्यासाठी 300 मिनिटे म्हणजे 5 तासांचा वेळ मिळत होता. जो आता वाढून 1440 मिनिटे म्हणजे 24 तासांवर जाईल. या योजनेचा लाभ केवळ तामिळनाडू सर्कलच्या वापरकर्त्यांनाच मिळणार आहे. जो येत्या काळात इतर राज्यांमध्येही लागू होऊ शकेल.