BSNL Prepaid Recharge Plans | बीएसएनएलची बेस्ट ऑफर ! फक्त 1 रुपया जादा भरा अन् मिळवा तिप्पट Data, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL Prepaid Recharge Plans | भारतातील सर्वात मोठी सरकारी कंपनी म्हणून भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL कडे बघितले जाते. दरम्यान BSNL ने अनेकवेळा आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर प्लान्स आणले आहेत. आताही BSNL पोर्टफोलिओ मध्ये एकापेक्षा अधिक स्वस्त आणि सर्वोत्तम प्रीपेड प्लान्स (Prepaid Plans) देत आहेत. BSNL च्या प्लानमध्ये (BSNL Prepaid Recharge Plans) एक रुपया अधिक खर्च केल्यास ग्राहकाला दुप्पट-तिप्पट लाभ देखील मिळू शकणार आहे.

बीएसएनएलच्या 2 रिचार्ज प्लानमधील फरक केवळ 1 रुपयाचा आहे. 1 रुपया अधिक देऊन तुम्ही केवळ दुप्पटच नाही तर तिप्पट लाभ मिळवू शकता. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लानची किंमत 298 आणि 299 रुपये आहे. या दोन्ही प्लानच्या किमतीत केवळ 1 रुपयांचा फरक आहे. पण, 1 रुपयांच्या या फरकामध्ये तुम्हाला तिप्पट डेटा लाभ मिळू शकणार आहे. (BSNL Prepaid Recharge Plans)

BSNL चा 298 रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग (Unlimited Voice Calling) उपलब्ध आहे. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये डेली 1 GB डेटा मिळतो. जर दैनंदिन डेटा मर्यादा संपते, तेव्हा इंटरनेटची गती 40 Kbps पर्यंत घसरते. या प्लानमध्ये दररोज 100 मोफत SMS मिळतात. या प्लानमध्ये 56 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर, EROS NOW एंटरटेनमेंट सबस्क्रिप्शनही उपलब्ध असणार आहे.

299 रुपयांचा प्लान –

BSNL च्या 299 रुपयांच्या रिचार्ज मध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज 3 GB डेटा मिळतो. जेव्हा दैनंदिन डेटा मर्यादा संपते, तेव्हा इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत घसरतो.
तसेच यात दररोज 100 मोफत SMS ही उपलब्ध आहेत. प्लानची वैधता 30 दिवसांची आहे.
तसेच, EROS NOW एंटरटेनमेंट सबस्क्रिप्शन ऑफर केले जातेय.

 

बीएसएनएलचा 299 रुपयांच्या प्लानची किंमत केवळ 1 रुपयांनी जास्त आहे.
या प्लानमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सारखे इतर सर्व फायदे उपलब्ध आहेत.
परंतु दररोज डेटा 1 GB ऐवजी 3 GB उपलब्ध आहे. वैधता 56 दिवसांऐवजी 30 दिवस आहे.
जर तुम्हाला दररोज अधिक डेटा हवा असेल तर तुम्ही 299 रुपयांचा प्लान घेऊ शकणार आहात.

Web Title :- BSNL Prepaid Recharge Plans | just pay 1 rupees extra and get 3 times better benefits know about bsnl 298 and 299 plans


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Obesity And Acidity | पाण्यात ‘ही’ एक वस्तू मिसळून पिण्यास करा सुरूवात, वितळू लागेल चरबी आणि दूर होईल अ‍ॅसिडिटी

Engineer Suicide In Aurangabad | ‘तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना’ ! इंजिनियर तरुणाची आत्महत्या, परिसरात प्रचंड खळबळ

Deepak Pandey IPS Nashik | ‘महसूल अधिकारी हे RDX सारखे आहेत तर….’ नाशिक पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप