BSNL चे जबरदस्त प्लान, रोज मिळतो 3 GB डेटा-कॉलिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सुद्धा एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन सारख्या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यात कोणतीच कसर सोडत नाही. BSNLने आपल्या ग्राहकांसाठी वेगवगेळे डेटा लिमिटचे प्लान आणले असून ज्या ग्राहकांना जास्त डेटा लागतो त्यांच्यासाठी हे प्लान फायदेशीर आहेत. त्या ग्राहकांसाठी BSNL ने रोज 3 जीबी डेटाचे प्रीपेड प्लान चांगले आहेत. BSNLच्या या प्लानची वैधता 8 दिवसांपासून ते 365 दिवसांपर्यंत आहेत.

78 रुपयांचा प्लान

BSNLचा हा प्लान रोज 3 जीबी डेटाचा सर्वात स्वस्त प्लान आहे. BSNL च्या 78 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना 8 दिवसांची वैधता मिळते. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच युजर्संना इरोस नाउ इंटरटेनमेंट सर्व्हिसचे सब्सक्रिप्शन मिळते.

247 रुपयाचा प्लान

या प्लानची वैधता 30 दिवसांची असून ग्राहकांना यामध्ये दररोज 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस रोज मिळतात. ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येते. हा प्लान जवळपास सर्वच सर्कलमध्ये आहे.

997 रुपयांचा प्लान

कंपनीचा हा प्लान 6 महिन्यांचा आहे. यामध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधतेसोबत दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये फ्रीमध्ये आपल्या पसंतीची कॉलर ट्यून निवडण्याची सुविधा मिळते. हा प्लान सुद्धा अनेक ठिकाणी लागू आहे.

1999 रुपयाचा प्लान

वर्षभराची वैधता असलेला हा प्लान आहे. 1999 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना 365 दिवस दररोज तीन जीबी डेटा मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, रोज 100 एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये फ्री कॉलर ट्यूनची सुविधा देण्यात आली आहे. तसेच दोन महिन्यांपर्यंत इरोज नाउ इंटरटेनमेंट सर्विसचे सब्सक्रिप्शन दिले जाते.