BSNL चा ग्राहकांना ‘झटका’, ! ‘या’ प्लॅनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL ने आपल्या सुरुवातीच्या काही प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. टेलिकॉम कंपन्या काही दिवसांपासून आपल्या दरात वाढ करत आहेत आणि यामध्येच आता बीएसएनलच्या ग्राहकांना देखील जोरदार झटका लागलेला आहे. कंपनीने आपल्या सुरुवातीच्या प्लॅनचा कालावधी देखील बदलला आहे.

BSNL चा आधीच प्लॅन हा 74 रुपये आणि 75 रुपयांचा आहे ज्याला 180 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. परंतु आता या प्लॅनमध्ये कंपनीने बदल केला आहे. आता या प्लॅनची व्हॅलिडिटी केवळ तीन महिन्यांची म्हणजेच 90 दिवसांची असणार आहे आणि यामध्ये मिळणारे फायदे मात्र आहे तेवढेच ठेवण्यात आलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 75 रुपयांच्या प्लॅनची आता व्हॅलिडिटी कमी केलेली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 10GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स दिले जातात. त्याचप्रमाणे यामध्ये 500 SMS आहेत. मात्र याची व्हॅलिडिटी केवळ 15 दिवसांची आहे.

153 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील केला बदल
बीएसएनएलनेही 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील बदल केले आहेत. सध्या कंपनी या योजनेंतर्गत अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल देते. याशिवाय दररोज 1.5GB डेटा ग्राहकांना दिला जातो. या योजनेत 100 एसएमएसचा देखील समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग आणि डेटा कालावधी येथे केवळ 28 दिवस आहेत.

आता नवीन बदलानुसार ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग तर मिळणार परंतु डेटा 1.5GB ऐवजी केवळ 1GB (प्रति दिन) असा मिळेल जो 28 दिवसांसाठी असेल. एकूणच व्हॅलिडिटी देखील अर्धी करण्यात आली आहे. यानुसार या प्लॅनला 90 दिवसांची व्हॅलिडिटी असेल. 14 जानेवारी 2020 पासून हे बदल लागू करण्यात येणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/