फायद्याची गोष्ट ! परत आली BSNL ची ऑफर, दुसर्‍यांचं रिचार्ज केल्यानंतर मिळणार ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने 4 टक्के त्वरित सवलत ऑफर पुन्हा आणली आहे. यासाठी ‘माय बीएसएनएल’ अ‍ॅपवरून रीचार्ज करावे लागेल. ही ऑफर फक्त माय बीएसएनएल अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी वैध आहे, जे दुसरे बीएसएनएल प्रीपेड मोबाइल खाते रिचार्ज करतात. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. बीएसएनएल कर्नाटकने ऑनलाइन परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली, जेथे पात्रतेचे नियमही सांगितले गेले आहेत. दरम्यान, ही ऑफर बीएसएनएलने एप्रिल अखेर जाहीर केली होती आणि त्यानंतर यासाठी शेवटची तारीख 31 मे ठेवली होती. यावेळी 4 टक्के त्वरित सवलत ऑफर सुमारे तीन महिन्यांपर्यंत वैध आहे.

बीएसएनएल कर्नाटकने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जो माय बीएसएनएल अ‍ॅप वापरकर्ता अ‍ॅपचा वापर कंपनीच्या दुसर्‍या वापरकर्त्याच्या प्रीपेड खात्यात रिचार्ज करण्यासाठी करेल, त्यांना ही 4 टक्के त्वरित सूट मिळेल. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध असल्याचे समजते. या परिपत्रकात असेही सांगितले गेले आहे की, केवळ नवीन वापरकर्त्यांनी स्वतःचे खाते रिचार्ज केल्यावर केवळ एकदाच सूट मिळेल. म्हणजेच, माय बीएसएनएल अ‍ॅपमध्ये आधीच नोंदणीकृत असलेल्या वापरकर्त्यांना त्यांचा नोंदणीकृत नंबर रिचार्ज करण्यास कोणतीही सूट मिळणार नाही.

दरम्यान, ही ऑफर सर्व प्रीपेड मोबाइल नंबरसाठी वैध आहे. ही त्वरित सवलत आहे, अशा परिस्थितीत वापरकर्त्यांकडून केवळ सवलतीच्या किंमतीवरच शुल्क आकारले जाईल. दुसरीकडे एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया सारख्या इतर कंपन्या दुसर्‍याचा नंबर रिचार्ज करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. म्हणूनच कदाचित बीएसएनएलने आपली जुनी ऑफर पुन्हा आणली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like