खुशखबर ! BSNL कडून खासगी कंपन्यांना जबरदस्त ‘टक्कर’, ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार दररोज 3GB ‘डाटा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवे नवे प्लॅन लॉन्च करत असते. आता देखील कंपनीने काही जुनेे प्लॅन रिवाइज केले आहेत. यात आपल्या 186 आणि 187 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनला कंपनीने रिवाइज केले आहे.

186 रुपयांचा धमाकेदार प्लॅन –
186 रुपयांचा प्लॅन कंपनीने काही महिन्यांपूर्वीच बंद केला होता. परंतू नुकताच पुन्हा एकदा हा प्लॅन सुरु करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांना या प्लॅनमध्ये 3 जीबी डाटा मिळणार आहे. यात दररोज 250 मिनिटांचे कॉलिंग आणि 100 मेसेज मोफत असेल. तसेच प्लॅनचा कालावधी 28 दिवसांचा असेल. आधी ही मर्यादा 2 जीबी होती. याचे डेली लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 40 Kbps होईल.

1.5 जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग –
153 रुपयांचा प्लॅन देखील रिवाइज करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये आधी 103 रुपयांचा टॉक टाइम आणि 100 रुपयांचा टॉप अप मिळत होते. तर कलावधी 28 दिवसांचा होता. परंतू आता ग्राहकांना या प्लॅनमध्ये 1.5 जीबी इंटरनेट डाटा मिळेल. तसेच अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा देखील कंपनीने दिली आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्लॅन कोणत्याही डेली लिमिट शिवाय असेल.

Visit : Policenama.com