केवळ 47 रूपयांमध्ये दररोज 1 GB डेटा अन् 100 SMS फ्री, 28 दिवस अनलिमिटेड कॉलिंग देखील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जर तुम्ही सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम (BSNL) चे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. BSNL ने कमी पैशात महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १ जीबी इंटरनेट देणारा आपला सर्वात स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. चला तर जाणून घेऊया या प्लॅन बाबत.

फक्त ४७ रुपयांत होणार रिचार्ज

BSNL ने लाँच केलेल्या ४७ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १ जीबी इंटरनेट तसेच १०० SMS प्राप्त होतील. BSNL च्या या नवीन प्लॅनमुळे खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या एयरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि वोडाफोन-आयडिया (Vi) यांच्यात टक्कर होणार आहे. काही जाणकार BSNL च्या प्लॅनला मास्टरस्ट्रोक, असे संबोधत आहेत.

एयरटेल, जिओ आणि Vi चे स्वस्त प्लान

खासगी दूरसंचार कंपनी एयरटेल १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. पहिला प्लॅन हा ७९ रुपयांचा तर, दुसरा प्लॅन ४९ रुपयांचा आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त २०० MB चा डेटा मिळतो. तसेच जिओ ५१ रुपये आणि २१ रुपयांचा प्लॅन ऑफर करते. मात्र, हे दोन्ही टॉप अप प्लॅन्स असून, त्याला कोणतीही वैधता नाही. वोडाफोन-आयडिया (Vi) चे ९८ रुपये आणि ४८ रुपयांचे दोन प्लॅन आहेत. पण यातील फायदे मर्यादीत आहेत.