BSNL च्या भन्नाट ऑफर, आता दररोज मिळणार 5GB डेटा, जाणून घ्या ‘या’ 4 प्लॅनबद्दल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इतर टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने बाजारात खास प्रिपेड प्लॅन्स आणले आहेत. 551, 1999, 1699, 109रुपयांचे हे प्लॅन्स आहेत.चला जाणून घेऊया काय आहेत हे BSNLचे वेगवेगळे प्लॅन्स

1) 551 रुपयांचा प्लॅन –
बीएसएनएलचा 551 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 5 जीबी डेटा म्हणजेच युजर्संना एकूण 450 जीबी डेटा मिळणार आहे. परंतु, कंपनी या प्लॅनसोबत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत नाही. या पॅकची वैधता 90 दिवस इतकी आहे. 551 रुपयांचा प्रीपेड प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना या प्लॅनला थर्ड पार्टी अ‍ॅप पेटीएम आणि फोन पे यावरूनही रिचार्ज करता येऊ शकते. हा प्लॅन केवळ 3जी नेटवर्क वापरणाऱ्या युजर्ससाठी आहे.

2) 1999 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा 1999 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये 80 दिवस 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. तसेच युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट दिले जातील. युजर्संना बीएसएनएल टीव्ही आणि ट्यून्सची सेवा मोफत दिली जाते. या पॅकची वैधता 356 दिवस आहे.

3) 1699 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा 1699 रुपयांचा प्लॅन असून यात युजर्संना दरदिवस 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस सुविधा दिली जाते. युजर्संना या पॅकमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल (250 मिनिट दरदिवस) करू शकतात. या पॅकची वैधता 365 दिवस इतकी आहे.

4) 109 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये युजर्संना 5 जीबी डेटा दिला जातो. युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी दरदिवस 250 मिनिटे मिळणार आहेत. या पॅकची वैधता ९० दिवस आहे.