BSNLचा ‘हा’ प्लान आता देशभरात उपलब्ध, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या 699 रुपयांचा व्हाऊचरला आता देशभरात उपलब्ध केले आहे. बीएसएनएलने केरळ सर्कल सोडून बाकीच्या सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध केले होते. परंतु, आता KeralaTeecom च्या एका रिपोर्टनुसार, हे व्हाऊचर आता केरळमध्ये सुद्धा उपलब्ध झाले असून 699 रुपयांच्या या व्हाऊचरमध्ये सर्व बेनिफिट्स आधीचेच मिळणार आहेत.

699 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे फायदे
BSNL ने दिलेल्या 699 रुपयांच्या वाउचरमध्ये युजर्संना रोज 0.5 जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 80Kbps होते. याशिवाय, युजर्संना रोज 100 एसएमएस आणि विना कोणत्याही FUP लिमिट शिवाय अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. या प्लानची वैधता 160 दिवसांची आहे. या प्लानला रिचार्ज करण्यासाठी युजर्स बीएसएनएलच्या वेबसाइटवर जाऊ शकते किंवा USSD कोड ‘*444*699#’ चा वापर करू शकता. याशिवाय PLAN BSNL699 लिहून 123 वर एसएमएस करू शकता.

केरळमध्ये 31 जानेवारी पर्यंत बीएसएनएलने प्रमोशन ऑफर अंतर्गत फ्री 4 जी सिम कार्ड ऑफर करत आहे. यात 4 जी सिम कार्ड मिळवण्यासाठी युजर्सला 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त फर्स्ट रिचार्ज कूपन रिचार्ज करावे लागणार आहे. यानंतर सर्व आवश्यक अटी पूर्ण करणा-यांना फ्री 4 जी सिम कार्ड मिळणार आहे. याशिवाय, रिपब्लिक डे 2021 ऑफर अंतर्गत कंपनी 398 रुपयांचा नवीन व्हाऊचर सुद्धा ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड व्हालीइस कॉलिंग व 100 एसएमएस मिळते. तसेच या प्लानची वैधता 30 दिवसांची राहणार आहे.