खुशखबर ! BSNL नं परत आणला ‘तो’ प्रीपेड प्लॅन, ज्यामध्ये 180 दिवसांची वैधता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खास सणांच्या निमित्ताने टेलिकॉम कंपन्यांकडून अनेक ऑफर्स येत आहेत. या सणासुदीच्या काळात खासकरुन सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ग्राहकांसाठी काही ऑफर दिल्या आहेत. सरकारी दूरसंचार कंपनीने आपली ९६ रुपयांची योजना पुन्हा बाजारात आणली आहे.

दरम्यान, बीएसएनएलने काही काळासाठी ही ऑफर प्रमोशनल ऑफर म्हणून दिली होती. नंतर ही योजना बंद करण्यात आली. आता कंपनीने पुन्हा नव्याने ही ऑर सुरू केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ९६ रुपयांच्या प्रीपेड योजनेचे नाव PV96 किंवा वसंतहॅम गोल्ड असे आहे. PV96 पुन्हा ९० दिवसांसाठी सुरू करण्यात आल्याची माहिती सध्या बीएसएनएलने दिली आहे. टेलिकॉम कंपनीने म्हटले आहे की ग्राहक ५ ऑक्टोबर २०१९ पासून या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या प्लॅन ची वैधता १८० दिवसांची आहे.

काय आहे ९६ चा प्लॅन :
९६ रुपयांच्या या प्रीपेड योजनेमध्ये १८० दिवसांची वैधता मिळणार असून यामुळे उपलब्ध लाभांची वैधता मात्र २१ दिवस आहे. या कालावधीत, ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर दररोज २५० मिनिटे कॉलिंग आणि राष्ट्रीय रोमिंग मिळतील. या कालावधीनंतर ग्राहकांना बेस प्लॅन नुसार शुल्क आकारले जाईल. कॉल व्यतिरिक्त, ग्राहकांना दररोज १०० एसएमएसचा लाभ देखील दिला जाईल.

हे आहेत अन्य प्लॅन :
९६ रुपयांच्या योजनेशिवाय बीएसएनएलने STV 118 आणि PV 153 या योजनांमध्येही बदल केले आहेत. आता यात PRBT चाही फायदा होणार आहे. ११८ रुपयांच्या योजनेत ग्राहकांना दररोज २५० मिनिटे आणि ०.५ जीबी डेटा (एफयूपीनंतर ४० केबीपीएस स्पीडने) मिळतो. या योजनेची वैधता २८ दिवसांची आहे.

त्याचप्रमाणे १५३ रुपयांच्या योजनेबद्दल सांगायचे झाल्यास दररोज २५० मिनिटे विनामूल्य कॉलिंगसाठी दिले जातात. यात मुंबई आणि दिल्ली सर्कलचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना यात रोमिंगचा लाभही मिळतो. कॉल करण्याशिवाय यात ०.५ जीबी डेटा (एफयूपीनंतर ४० केबीपीएस) देखील देण्यात आला आहे. या योजनेची वैधता देखील केवळ २८ दिवसांची आहे.

visit : Policenama.com