BSNL च्या 1.76 लाख कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दिवाळीपुर्वीच होणार ‘या’ महिन्याची पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे वेतन दिवाळी आधीच मिळणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार BSNL चे चेअरमन पीके पुरवर यांनी सांगितले की, दिवाळी आधीच कंपनी कर्मचाऱ्यांना आपले वेतन देणार आहे. सेवाच्या माध्यमातून कंपनीला महिन्याला 1,600 कोटी कमाई होते आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च महिन्याला 850 कोटी रुपये इतका आहे.

आता पुढे काय –
पुरवर यांनी सांगितले की 4 जी स्‍पेक्‍ट्रम मिळने आणि वॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम (VRS) मुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आर्थिक चिंता थोडी कमी झाली आहे. जरी हे सरकारच्या नियमावलीत असले तरीही याला वेळ लागणार आहे.

अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय BSNL आणि MTNL च्या पुनर्निर्मितीसाठी 50,000 कोटी रुपये खर्च करण्याच्या विचारात आहे.

पुढील आठवड्यामध्ये BSNL-MTNL च्या पुनर्बांधणीच्या प्लॅन वर चर्चा होऊ शकते. या कॅबिनेट बैठकीदरम्यान 13 हजार कोटी रुपये VRS प्लॅनला सुद्धा मंजुरी मिळणार आहे.

BSNL वेतन वाटपासाठी दरमहा 850 कोटी रुपये खर्च करते आणि कंपनी महिन्याला 1,600 कोटींची कमाई करते. मात्र वेतन करण्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही कारण या रकमेतील एक मोठा हिस्सा व्यवस्थापनावर देखील खर्च होतो.

मिळालेल्या माहितीनुसार BSNL बँकांच्या मार्फत सरकारी मदत (फंड) मिळवण्याचा देखील प्रयत्न करत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी