BSNLची नवीन वर्षात धमाकेदार ऑफर ! 16 जानेवारीपर्यंत ग्राहकांना मिळणार ‘फ्री’ सिम कार्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षात सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने पुन्हा एकदा फ्री सिम कार्ड ऑफर आणली आहे. १६ जानेवारी २०२१ पर्यंत वैध असणाऱ्या या ऑफर अंतर्गत बीएसएनएल सर्व नवीन ग्राहकांना २० रुपये किंमतीचे सिम कार्ड फ्री देत आहे. परंतु, या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना FRC म्हणजेच पहिले रिचार्ज व्हॅल्यू १०० रुपयांहून जास्त असायला हवा.

ही ऑफर चेन्नई आणि तामिळनाडू टेलिकॉम सर्कलसाठी आहे.
बीएसएनएलने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा १०० रुपयांहून जास्त रिचार्ज करण्याऱ्या ग्राहकांना फ्री (२० रुपये किंमतीचा) सिम कार्ड मिळणार आहे. बीएसएनएलच्या सब्सक्राइबर्स १०८ रुपयांचे एफआरसी प्लानमध्ये २५० मिनिट प्रतिदिन, १ जीबी डेटा रोज आणि ५०० एसएमएस रोज मिळू शकतात. या प्लानची वैधता ४५ दिवसांची आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्या ९७ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर एफआरसी ऑफर करते. परंतु, बीएसएनएलच्या १०८ रुपयांच्या एफआरसी सारखे फायदे मिळत नाही.

रिपब्लिक डे २०२१ ऑफरची घोषणा
बीएसएनएलने फ्री सिम कार्ड देण्याबरोबरच रिपब्लिक डे २०२१ ऑफरची सुद्धा घोषणा केली आहे. एक हजार ९९९ रुपयांच्या प्लानची वैधता २१ दिवसांनी वाढवली आहे. तर दोन हजार ३९९ रुपयांच्या प्लानची वैधता सुद्धा ७२ दिवसांनी वाढवली आहे. १९९९ रुपयांच्या बीएसएनएलच्या प्लानची वैधता आता ३८६ दिवस तर २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ४३७ दिवसांची आहे.