खुशखबर ! BSNL चा भन्नाट ‘ट्रिपल प्ले’ प्लॅन, ग्राहकांसाठी ‘LIVE TV’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – बीएसएनएलने नुकतेच Yupp TV बरोबर पार्टनरशिप केली आहे. यानतंर आता कंपनी नव्या बीएसएनएल ट्रिपल प्ले प्लॅन सर्विस ऑफर करेल. पार्टनरशिपचे कारण बीएसएनएल आपल्या ग्राहकांना तीन सेवा ऑफर करणार आहे. यात लॅडलाइन इंटरनेट, फायबर इंटरनेट आणि Yupp TV तून OTT कंटेटचा समावेश असेल.

काय आहे Yupp TV –
हे एक साऊथ अशियाचे ओवर द टॉप कंटेंट प्रोवायडर आहे. हे यूजर्सचे व्हिडिओ ऑन डिमांड, मूवीज आणि प्रोग्रम रिकॉर्ड करण्याबरोबर अनेक मोठे प्रोग्राम रेकॉर्ड करण्याची सुविधा आहे. तर बीएसएनएलने त्यांच्याबरोबर करार केला आहे, त्यामुळे ग्राहकांना लाईव्ह टीव्ही पाहण्याची देखील संधी मिळेल.

या पार्टनरशिपमुळे कंपनी आपल्या फायबर नेटवर्कला आणखी उत्तम बनवू शकेल. बीएसएनएल ट्रिपल प्ले सर्विस ऑफर करणारी पहिली कंपनी आहे. एका रिपोर्ट नुसार रिलायन्स जिओ ही पहिली कंपनी आहे ज्या कंपनीने ट्रिपल प्ले सर्विस देण्यास सुरुवात केली. ट्रिपल प्ले सर्विस एक अशी सर्विस आहे ज्यातून ग्राहक एका बिल अंतर्गत तीन विविध सेवा मिळतील.

रिपोर्टनुसार बीएसएनएलच्या सीएमडी पीके पुरवार यांनी सांगितले की आम्ही Yupp TV शी जोडल्या गेल्याने खुश आहोत. त्यामुळे ग्राहकांना देखील उत्तम सुविधा मिळेल. Yupp TV चा दावा आहे की यातून साउथ इंडियातील 13 ओरिजनल शो पाहिले जाऊ शकतील. Yupp TV चे फाऊंडर आणि सीईओ उद्य रेड्डी यांनी सांगितले की हे अॅप ग्राहकांचे उत्तम आणि परिणामकारक मनोरंजन करेल.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा