‘BSNL’ ची Jioला ‘टक्कर’ ! ग्राहकांना प्रति कॉलवर 6 पैसे परत देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओला सरकारी कंपनी बीएसएनएल टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जिओने इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 6 पैसे प्रतिमिनिट आकारण्याचा निर्णय घेतला आहे, त्याला टक्कर म्हणून बीएसएनएलने ग्राहकांना प्रत्येक 5 मिनिटांच्या कॉलवर 6 पैसे परत देण्याची धमाकेदार ऑफर दिली आहे. एअरटेल आणि वोडाफोनने देखील आययूसी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे, परंतू बीएसएनएलने याही पुढे जाऊन ग्राहकांना कॉलिंगवर 6 पैसे परत देण्याची आनोखी ऑफर आणली आहे.

बीएसएनएलच्या मते प्रत्येक 5 मिनिटांच्या कॉलिंगनंतर ग्राहकांच्या बॅलेंसमध्ये 6 पैसे परत करण्यात येणार आहे. ही ऑफर देशात बीएसएनएलच्या वायरलाइन, ब्रॉडबँड तसेच एफटीटीएच ग्राहकांना मिळेल. जिओच्या आययूसीच्या प्रकरणानंतर कंपनीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. कंपनी नव्या ग्राहकांना मिळवण्यासाठी ही ऑफर फायदेशीर ठरेल.

जिओला बीएसएनएलच्या या निर्णयाचा फायदा होईल. जिओने मागील दोन वर्षापासून आपला दबदबा वाढवला आहे. कंपनीने स्वस्तात इंटरनेट डाटा आणि व्हाईस कॉलिंगची सुविधा मोफत देत इतर कंपन्याचे ग्राहक आपल्याकडे वळवले. परंतू आता जिओने अन्य नेटवर्कवर शुल्क आकारण्यास सुरुवात केल्याने ग्राहक नाराज झाले आहेत, याचा फायदा इतर कंपन्या घेत आहेत.

जिओच्या आययूसी शुल्क आकारण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर एअरटेल आणि वोडाफोनने हे शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिओचे अनेक ग्राहक इतर कंपन्यांकडे वळत आहेत. कॉल टर्मिनेशल चार्जच्या नियमानुसार व्हाईस कॉल शुल्क आकारण्याचे जाहीर केले, त्यात जिओ टू जिओ कॉलिंग फ्री आहे तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी पैसे आकारण्यात येत आहे, हे शुल्क 6 पैसे आहे. परंतू त्याची भरपाई म्हणून जिओ ग्राहकांना अतिरिक्त डाटा देत आहे.

जिओ ग्राहकांकडून इतर नेटवर्कवर कॉलिंग केल्यास त्यांना प्रति मिनिटाला 6 पैसे द्यावे लागतील असे कंपनीने सांगितले होते, हे शुल्क जिओ टू जिओ कॉल करणाऱ्या ग्राहकांना लागू नसेल.

Visit : Policenama.com