BSNL : सीमकार्ड बदलण्यासाठी आत्ता फक्त 50 % ‘शुल्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या सिमकार्ड बदलण्यासाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये कपात केली आहे. या शुल्कामध्ये ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे ग्राहकांना यासाठी फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

३१ ऑक्टाेबरपासून सुरु होणार सिम रिप्लेसमेंट सुविधा

बीएसएनएलने मागील वर्षी आपल्या या शुल्कांमध्ये वाद करत १० रुपयांवरून हे शुल्क थेट १०० रुपये केले होते. हे शुल्क थेट १० पटीने वाढवल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. कंपनीने एक निवेदन काढून यासंबंधी माहिती देताना सांगितले कि, सिमकार्ड बदलण्यासाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये कपात करण्यात येत आहे. त्यामुळे आता यापुढे १०० रुपयांऐवजी फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

दरम्यान, कमी केलेले हे शुल्क लवकरच लागू होणार असून १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टाेबर पर्यंत सिम रिप्लेसमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त