फायद्याची गोष्ट ! BSNLचा जबरदस्त प्लॅन, दररोज मिळणार 5GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. २८ जुलै : तोट्यात गेलेल्या बीसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी चांगले प्लॅन्स आणले आहेत. यामुळे त्यांना कॉलिंग आणि इंटरनेट याचा अधिक प्रमाणात लाभ घेता येणार आहे. बीसएनएलला स्पर्धक ठरणाऱ्या इतर कंपन्यांचे कॉलिंग आणि इंटरनेट प्लॅन्स दिवसेंदिवस महाग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशावेळी मात्र, बीसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी कॉलिंग आणि इंटरनेट या संदर्भातील प्लॅन्स सादर करून दिलासा दिला आहे.

BSNL यूजर्सला अनेक जबरदस्त 4G प्रीपेड प्लॅन ऑफर केले आहेत. कंपनीच्या पोर्टफोलियोत आता अनलिमिटेड फ्री कॉलिंगसोबत दररोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाणारे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. यातील काही प्लॅन्स असे आहेत ज्यात वर्षभर वैधता आणि दररोज ५ जीबी पर्यंत डेटा मिळत आहे. .

९९७ रुपयांचा प्लॅन आणि भरपूर लाभ
बीएसएनएलचा हा प्लॅन खूप जबरदस्त आहे. ज्या युजर्संना जास्त डेटा आणि कॉलिंगचा फायदा घ्यायचा आहे तसेच सोबतच मोठी वैधता हवी असेल अशा युजर्संसाठी हा प्लॅन खूप चांगला आहे. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंगसोबत दररोज २५० फ्री एसएमएस मिळत आहेत. दररोज १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लॅनमध्ये १८० दिवसांची वैधता दिली आहे.

१९९९ रुपयांचा प्लॅन आणि इरॉज नाउचे फ्री सब्सक्रिप्शन
एका वर्षाची वैधता हवी असलेला हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला आहे. यात दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी २५० मिनिट आणि १०० फ्री एसएमएस दिले जात आहेत. प्लॅनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात दोन महिन्यांसाठी इरॉज नाउचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

५९९ रुपयांचा STV आणि ५ जीबी डेटा
बीएसएनएलचा हा स्पेशल टॅरिफ व्हाउचर असून यात दररोज ५ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच कंपनी या व्हाऊचरमध्ये दररोज कॉलिंगसाठी २५० मिनिट देत आहेत. ९० दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जात आहेत कंपनीने या प्लॅनला वर्क फ्रॉम होम एसटीव्ही म्हणून लाँच केले आहे होते.

३६५ रुपयांचा प्लॅन आणि फ्री कॉलर ट्यून
६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज २५० मिनिटांची फ्री कॉलिंग दिली जात आहे. प्लॅनच्या सब्सक्रायबर्सला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि फ्री कॉलर ट्यूनचा देखील लाभ मिळत आहे.

१८७ रुपयांचा एसटीव्ही आणि २ जीबी डेटा
बीएसएनएलचा हा प्लॅन २८ दिवसांची वैधतेसोबत दिला जात आहे. या प्लॅनमध्ये २५० मिनिट फ्री कॉलिंग आणि दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. बाकी प्लॅनप्रमाणे दररोज १०० फ्री एसएमएस सेवा मिळत आहे.

तर, हे आहेत बीसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी चांगले प्लॅन्स. याचा लाभ अधिकाधिक ग्राहक घेतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. या प्लॅनमुळे अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसेच इतर कंपन्यांचे ग्राहक देखील बीसएनएलकडे वळतील असेही समजत आहे.