लोकसभा निवडणूक : सपा-बसपा आघाडी झाली जाहीर ; पहा जागावाटप 

लखनऊ : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांची आघाडी झाली असून दोन्ही पक्ष लोकसभेच्या प्रत्येकी ३८ जागा लढवणार असून अखिलेश यादव आणि मायावती लखनऊ मधील ताज हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीला आपले दोन पक्ष आघाडी करून लढणार आहेत असे जाहीर केले. प्रत्येकी  ३८ जागा लढवण्याचा निर्धार केला असून  या आघाडीत काँग्रेसला कसलेच स्थान नाही मात्र अमेठी येथून राहुल गांधी आणि रायबरेली येथून सोनिया गांधी यांच्या विरोधात सपा-बसपा आघाडी उमेदवार रिंगणात उतरवणार नाही.

राष्ट्रीय लोक दल आणि निशाद पार्टी या दोन पक्षांना हि या निवडणुकीत सोबत घेऊन यांना हि काही जागा देण्याचा या दोन्ही पक्षांचा मनोदय होता. त्यांच्या सोबत  वाटा घाटीकरून चर्चा झाल्या नाहीत. या दोन्ही पक्षांना हि या पत्रकार परिषदेला बोलवण्यात आले होते.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मायावती यांनी मोदींना आणि अमित शहा यांच्या गुरु शिष्याच्या जोडींला लक्ष करत त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला. त्यात त्यांनी म्हणले के १९७७ साली जशी काँग्रेसची गाळण उडाली होती तशी गाळण भाजपची या निवडणुकीत उडणार आहे असे मायावती यांनी म्हणले आहे. भाजपने आमची आघाडी तुटावी म्हणून अखिलेश  यादव यांच्या मागे सीबीआय चौकशीची ससेमारी लावली अशी टीका मायावती यांनी भाजपवर केली.

असे असेल सपा-बसपा आघाडीचे जागा वाटप 

बहुजन समाज पार्टी -३८ जागी लढणार
समाजवादी पार्टी -३८ जागी लढणार
राष्ट्रीय लोक दल – १ जागी लढणार
निशाद पार्टी – १जागी लढणार

तर अमेठी येथून राहुल गांधी आणि रायबरेली येथून सोनिया गांधी यांच्या विरोधात सपा-बसपा आघाडी उमेदवार निवडणूक लढणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us