तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना पळवून पळवून चप्पलाने मारीन : बसपा नेत्याचे बेताल वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना पळवून पळवून चप्पलाने मारीन असे वादग्रस्त वक्तव्य बसपाचे उमेदवार गुड्‍डू पंडित यांनी केले आहे. उत्‍तर प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार आणि त्‍यांच्या समर्थकांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. याच दरम्यान, बसपाचे उमेदवार गुड्‍डू पंडित यांनी उत्‍तर प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार राज बब्‍बर यांच्यावर कडाडून टीकास्त्र सोडले. त्यावेळी, ऐका राज बब्बरच्या, तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना पळवून पळवून चप्पलाने मारीन. जे समाजात चुकीचा समज पसरवत आहेत त्यांना चप्पलाने मारीन. तसेच तुझ्या आणि तुच्या दलालांना मारीन. अशा शब्दात बसपाचे उमेदवार गुड्‍डू पंडित यांनी टीका केली.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कडक कारवाई केली असूनही नेते वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. यापूर्वीही समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात वक्तव्य केले होते. तसेच भाजचे सतपाल सिंह सत्ती यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच आज भाजप आमदाराचे मतदानासाठी मतदारांना धमकावणे असाही प्रकार घडला आहे. निवडणूक आयोग कारवाई करूनही वादग्रस्त वक्तव्ये थांबत नसतील तर निवडणूक आयोग आणखी काय पाऊल उचलेल याची सगळे जण वाट पाहत आहे.