CAA : विरोधकांच्या एकजुटतेमध्ये उभी फूट, सोनिया गांधींच्या बैठकीपासून ‘ममता-मायावती आणि आप’ दूरच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि विविध विद्यापीठांमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध लक्षात घेऊन विरोधी पक्षांची बैठक सोमवारी बोलविण्यात आली आहे. कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वाम मोर्चासह सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) या बैठकीत भाग घेणार नाहीत, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बसपाचे कॉंग्रेसमधील मतभेद हे यामागील कारण असल्याचे समजते. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच या बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्ष सीएएच्या विरोधात राष्ट्रपतींकडे गेले असता बसपायावेळी उपस्थित नव्हती. मात्र, पक्षाने नंतर या मुद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

मायावतींनी दिले स्पष्टीकरण :
दरम्यान, मायावतींनी ट्वीट करत सांगितले कि, राजस्थान कॉंग्रेस सरकारला बसपाने बाहेरून पाठिंबा दर्शविला असूनही त्यांनी तेथील बसपाच्या आमदारांना तोडले आहे आणि त्यांना आपल्या पक्षात जोडले आहे, जो पूर्णपणे विश्वासघात आहे. अशा परिस्थितीत आज कॉंग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी बोलावलेल्या बैठकीत बसपाचा समावेश केल्याने राजस्थानातील पक्षाच्या लोकांत नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे बसपा या बैठकीस भाग घेणार नाही. तरीही बसपा सीएए आणि एनआरसी विरोधात आहे. हा फूट पाडणारा आणि असंवैधानिक कायदा मागे घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारला पुढे करण्यात आले आहे. तसेच जेएनयू आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

बैठकीत आम आदमी पार्टीचा समावेश नाही :
आम आदमी पक्षानेही नागरिकत्व कायदा आणि सीएएला बोलाविलेल्या विरोधी बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचा कोणताही नेता या बैठकीत भाग घेणार नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, गरज पडल्यास त्या एकट्याच लढा देतील.

सभागृहातच त्यांनी विद्यापीठाच्या परिसरातील हिंसा आणि सीएएवरील विरोधात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १३ जानेवारी रोजी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. तसेच बुधवारी कामगार संघटना बंद दरम्यान राज्यातील डाव्या आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कथित हिंसाचाराबद्दल बॅनर्जी संतप्त आहेत. केंद्र सरकारची चुकीची आर्थिक धोरणे, सुधारित नागरिकत्व कायदा आणि देशभरातील प्रस्तावित एनआरसीच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला.

ममता काँग्रेसला उद्देशून म्हणाल्या कि, तुम्ही पश्चिम बंगालमध्ये एक धोरण वापरता आणि दिल्लीमध्ये एक त्यामुळे मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत. वेळ पडली तर मी एकटी याविरुद्ध लढा देईल.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, ‘ममता बॅनर्जी यांच्या कोणत्याही निर्णयाची मला माहिती नाही. माझ्या माहितीनुसार, कॉंग्रेस पक्षाने संसदेच्या आत आणि बाहेर सीएए आणि एनआरसीविरोधात आवाज उठविला आहे आणि विरोधी नेत्यांना 13 जानेवारीच्या बैठकीस येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्या येतील की नाही हे मी सांगू शकत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/