भारत-चीन वादावर बसपा भाजपबरोबर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “भारत-चीन सीमाप्रश्नाच्या मुद्दय़ावर बहुजन समाज पार्टी भाजपाबरोबर उभी आहे. भारत-चीन सीमा विवाद प्रकरणावर भाजप आणि कॉंग्रेसकडून आरोप- प्रत्यारोपाची फेरी सुरु आहे, जे राष्ट्रीय हितात नाही. बसपा प्रमुख म्हणाल्या कि, “एकीकडे चीन या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, तर दुसरीकडे इतर मुद्द्यांमुळे याकडे दुर्लक्ष केले जात आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे.”

ते म्हणाले, मागासवर्गीय लोक, आदिवासी आणि जे अल्पसंख्यक आहेत अशा लोकांच्या हितासाठी बसपाची स्थापना केली गेली होती. जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा कॉंग्रेसची सत्ता होती. या वर्गासाठी कॉंग्रेस पक्षाने काहीतरी केले असते तर आपल्याला बसपाची स्थापना करण्याची गरज भासली नसती. मी भाजप आणि कॉंग्रेसला सांगू इच्छिते की, बसपा कोणासाठी खेळणे नाही. हा राष्ट्रीय स्तरावर स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष आहे. ”

बसपा प्रमुखांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवत म्हंटले कि, कोविड -19 दरम्यान आपल्या राज्यात परत आलेले कामगार कॉंग्रेसची सत्ता असताना पोटापाण्यासाठी इतर राज्यांत गेले होते. कॉंग्रेसने त्यांच्या मदतीसाठी काहीतरी केले असते तर ते रोजगाराच्या शोधात इतर राज्यांकडे वळले नसते.