आज मायावतींचा वाढदिवस ; ६३ किलोचा कापणार केक 

लखनऊ : वृत्तसंस्था  – बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांचा आज मंगळवारी ६३ वा जन्मदिन आहे. बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून त्यांच्यासाठी ६३ किलोचा केक बनवून आणणार आहेत. हा केक मायावती लखनऊ येथे कापणार असून वाढदिवसा निमित्त मायावती ‘ब्लू बुक’ चे विमोचन देखील करणार आहेत. त्यानंतर मायावती दिल्लीला जाणार असून  तेथे त्या मित्रपक्षांच्या नेत्यांकडून शुभेच्छा स्वीकारणार आहेत. तर अखिलेश यादव यांनी सकाळीच मायावती यांच्या घरी जाऊन त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मायावतींचा वाढदिवस या आधी हि अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. मागच्या काही वाढदिवसा निमित्त लोक मायावतींना देणग्या द्यायला येत असत. या देणग्या म्हणजे बसपाची कोटी रुपयांची उलाढाल असे. याच पैशावर दर वर्षी निवडणुका लढवल्या जात असत. मात्र नोटबंदी नंतर उघड देणग्या स्वीकारण्याची परंपरा मायावतींनी सोडून दिली. मायावतींच्या वाढदिवसाचे संपूर्ण लखनऊ शहरात बॅनर लावण्यात आले असून विशेष बाब म्हणजे बसपा सोबत सपाचे कार्यकर्ते हि मायावतीच्या वाढदिवसाचे बॅनर लावत आहेत.

खुशखबर… आता ‘एवढ्या’ लाखांपर्यंतच वार्षिक उत्पन्न होणार करमुक्त 

मायावतींचा वाढदिवस बसपाचे कार्यकर्ते  ‘जन कल्याणकारी दिवस’ म्हणून साजरा करतात. आजचा जन्मदिन हि असाच साजरा केला जाण्याची शक्यता आहे. मायावतींच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे कार्यकर्ते गोर गरीबांना कपडे वाटण्याचे,स्नेह भोजन देण्याचे आणि जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचे काम करत असतात.

तर सपा आणि बसपाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आज मोठा उत्साह बघण्यास मिळाला आहे. कारण मागच्या काही दिवसात सपा बसपामध्ये आघाडी झाली आहे. येती लोकसभा दोन्ही पक्ष आघाडी करून लढणार असून दोन्ही पक्ष प्रत्येकी ३८ जागी लढणार आहेत. त्यांच्या अन्य दोन मित्र पक्षांना प्रत्येकी एक जागा सोडली असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीतून त्यांच्या उमेदवार दिले जाणार नाहीत असे सपा बसपा आघाडीने जाहीर केले आहे.