BSP MP Satish Chandra Mishra | सतीश चंद्र मिश्रा यांचा दावा – यूपीत प्रत्येक 10 पैकी 8 एन्काऊंटर ब्राह्मणांचे होत आहेत

प्रयागराज : पोलीसनामा ऑनलाइन BSP MP Satish Chandra Mishra | ‘उत्तर प्रदेशात झालेल्या एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात बहुजन समाज पार्टीचे महासचिव आणि खासदार सतीश चंद्र मिश्रा (BSP MP Satish Chandra Mishra) सहभागी झाले होते. त्यांनी दावा केला की, बीएसपी 2022 मध्ये मजबूतीसह परतणार आहे आणि मायावती 5व्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री होतील. त्यांनी म्हटले, भाजपा आणि समाजवादी पार्टीचे नाव आवश्य आहे, परंतु ते आमची कॉपी करत आहेत. सध्या आम्ही खुप सक्रिय आहोत आणि आम्ही संपूर्ण यूपीत जमीनीवर काम करत आहोत. 2007 मध्ये आम्ही जेवढ्या जागा जिंकल्या होत्या, त्यापेक्षा जास्त जागा 2022 मध्ये जिंकून आम्ही सत्तेत परतू.

ब्राह्मण संमेलनाच्या आयोजनावर त्यांनी म्हटले, आम्ही नेहमीच लोकांमध्ये होतो.
अगोदर सुद्धा ब्राह्मणांनी आम्हाला साथ दिली. तो बुद्धीजीवी समाज आहे.
सपा आणि भाजपाने त्याच्यासोबत कपट केले आहे. आता ब्राह्मण समाज आमच्या सोबत आहे.
आम्ही नेहमी स्थान दिले आहे आणि जर तुम्ही विचार करत असाल की, ब्राह्मण तुमच्या सोबत आहेत तर चुकीचे आहे. ब्राह्मणांसह दलितसुद्धा सोबत आहेत.

मात्र, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, निवडणुकीत बीएसपी किती ब्राह्मणांना तिकिट देईल.
तेव्हा त्यांनी म्हटले की, आम्ही जातीच्या आधारवर तिकिट देत नाही तर कार्य पाहून देतो.

त्यांनी दावा केला की, आज ब्राह्मण समाजाचा छळ होत आहे.
उत्तर प्रदेशात, जितके एन्काऊंटर होत आहेत, 10 पैकी 8 ब्राह्मण समाजाचे होत आहेत.

 

आम्ही भाजपाची पोलखोल केली

जेव्हा विचारण्यात आले की लोक म्हणत आहेत की, बीएसपी आता भाजपासारखीच दिसत आहे.
यावर सतीश चंद्र मिश्रा म्हणाले, अगोदर आम्ही अयोध्येला गेलो. मागे-मागे योगीजी आले.
आम्ही अयोध्येत जाऊन भाजपाची पोलखोल केली. आम्ही जेव्हा म्हटले की, मंदिर उभारले जात नाही, तेव्हा घाईघाईत सीमेंट टाकून विटा बनवण्याबाबत बोलत आहेत.
आम्ही समाजाला एकत्र आणत आहोत.

 

Web Title : BSP MP Satish Chandra Mishra | bsp satish chandra mishra bjp congress sp assembly election 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 80 रुग्णांचा मृत्यू, 3,841 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Digital Garage King | पोलीस भरतीची तयारी करणारा तरुण बनला ‘डिजिटल किंग’

Social Media Market | सन 2025 पर्यंत सोशल मीडियाचं मार्केट 2200 कोटी रुपये होण्याची अपेक्षा – रिपोर्टमध्ये दावा