देशात हा आहे सध्याचा सर्वात श्रीमंत पक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले आहेत. सध्या उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यात उमेदवारांची संपत्ती किती आहे. याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु देशातील सर्वात श्रीमंत पक्ष कोणता आहे. हे तुम्हाला ठाऊक आहे का? निवडणूक आयोगाने यासंदर्भात एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार देशात सर्वात श्रीमंत पक्षाने बॅलेन्सच्या बाबतीत भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना मागे टाकले आहे.

बहनजी मायावती यांचा बहुजन समाज पक्ष हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर समाजवादी पक्ष आहे. तर देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय पक्ष असलेले कॉंग्रेस आणि भाजप हे बॅलेन्सच्या बाबतीत त्यांच्या आसपासही नाहीत. कॉंग्रेस या यादीत तिसऱ्या क्रमांकावर तर चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्ष या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

राजकिय पक्षांनी आपल्या जमा झालेल्या फंडातील रक्कमेचा खर्च व त्यातून शिल्लक रकमेचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. भाजपने दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे २०१७-१८ या वर्षात १ हजार २७ कोटी रुपयांची देणगी जमा झाली होती. परंतु त्यांनी ७२८ कोटी रुपये खर्च केले आहेत. खर्चाच्या बाबतीत सध्या भाजप आघाडीवर आहे.

कोणाकडे किती बॅलन्स

बसपा – ६६९ कोटी

सपा – ४७१ कोटी

कॉंग्रेस – १९६ कोटी

टीडीपी १०७ कोटी

भाजपा – ८२ कोटी