बसपा प्रमुख मायावती यांचे वडिल प्रभू दयाल यांचे निधन

लखनौ/ नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाईन – बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती (BSP Supremo Mayawati) यांचे वडील प्रभू दयाल (वय 95) (Prabhu Dayal) यांचे निधन ( bsp-supremo-mayawati-father-prabhu-dayal-dies-95-delhi)झाले आहे. शुक्रवारी (दि. 20) दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दयाल हे दिल्लीतील रकाबगंज येथे राहत होते. प्रभू दयाल यांच्या निधनानंतर बसपाचे राष्‍ट्रीय महासचिव आणि राज्‍यसभा खासदार सतीश चंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

दरमयान उत्तर प्रदेशेचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त करत, माजी मुख्यमंत्री मायावतीजी यांचे वडील श्री प्रभू दयालजी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. मी मायावती तथा त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. प्रभू श्री रामांना प्रार्थना आहे, की दिवंगत आत्म्याला आपल्या श्री चरणांत स्थान द्यावे. ॐ शांती!”,असे ट्विट केले आहे.

मायावतींना आयएएस बनवण्याची वडीलांची होती इच्छा
मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे शिफ्ट झाले होते. यानंतर मायावती आणि त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण दिल्ली येथेच झाले. मायावती यांना आयएएस अधिकारी बनवण्याची प्रभू दयाल यांची इच्छा होती. मात्र, बसपा संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर मायावती यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही झाल्या होत्या.