भारत बंद दरम्यानचे गुन्हे मागे घ्या अन्यथा पाठींबा काढू ; मायावतींच्या धमक्या सुरु 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशाच्या नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारला मायावतींनी स्वभावा प्रमाणे धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्तीच्या निकषाने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ २ एप्रिल २०१८ ठेवलेल्या भारत बंद दरम्यान उसळलेल्या हिंसाचारातील दलितांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा आपण सरकारचा पाठींबा काढू. असे बसपा सुप्रीमो मायावती यांनी म्हणले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसला बसपाच्या आमदारांनी पाठींबा दिला आहे. तर मध्य प्रदेशात तर बसपाच्या पाठींब्या शिवाय सरकार तरणे अशक्य बाब असल्याचे निकालाचे आकडे सांगत आहेत.

भाजप सरकारच्या काळात सूड बुद्धीने आणि जातीवादाच्या भेदातून गुन्हे दाखल केले होते. ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते लोक निर्दोष आहेत त्यांना या गुन्ह्यांतून मुक्त करण्यात यावे. तसेच राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर ठोस पावले उचलण्यात यावी असे मायावती यांनी म्हणले आहे. मध्य प्रदेशात सरकारच्या विधानसभेतील संख्याबळात बहुजन समाज पार्टीची महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याच प्रमाणे निवडणूकीच्या पूर्वी बसपा आणि काँग्रेसची जागा वाटपाच्या चर्चेत सम्मती नझाल्याने काँग्रेसने आघाडी करण्यास नकार दिला त्यामुळे बसपा प्रमुख मायावतींच्या मनात त्या राज्याच्या जागा वाटपा वरून वितुष्टाची भूमिका असणार आहे म्हणून काँग्रेसला पाच वर्षाची सत्ता बसपाच्या जाचातच काढावी लागणार आहे.

मध्यप्रदेशात मायावतींनी विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या घोडदौडीमुळे राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसला हि धडकी भरली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला बसपाच्या पाठींबा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काँग्रेसला बसपाच्या प्रभावाखाली रहावेच लागणार आहे. कारण १५ वर्षानंतर आलेले सरकार असे अर्ध्यावर सोडणे काँग्रेसला कदापी परवडणार नाही. गोल्हेर शहरात २ एप्रिल रोजी बंद दरम्यान झालेल्या आंदोलनात गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर मध्यप्रदेशात हिंसाचार असल्याने अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आता हे गुन्हे मागे घेण्याची मागणी मायावती यांनी केली आहे. मायावतींच्या या भूमिके वरून त्याच्यात आणि काँग्रेस मध्ये होणारी महाआघाडी हि अशक्यच असल्याचे चित्र आहे.