Budget : ‘स्टार्ट अप’वर लावण्यात येणार ‘हा’ कर ‘रद्द’, सुरु होणार खास ‘टीव्ही’ प्रोग्राम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्पात स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यात स्टार्ट अप सुरु करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. स्टार्टअप साठी असलेल्या एंजल टॅक्समधून मुक्तता केली आहे. एवढेच नाही तर यासाठी दूरदर्शनवर विशेष टीव्ही प्रोग्रोम देखील सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय शेअर मधील किंमतीबाबत सरकारकडून कोणतीही विचारणा करण्यात येणार नाही.

स्टार्ट अपला सहाय्य करण्यासाठी विशेष टीव्ही प्रोग्राम –

दूरदर्शनच्या चॅनलवर विशेष स्वरुपाचा स्टार्टअपसाठी टीव्ही प्रोग्राम सुरु करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स्टार्ट अप ला प्रोस्ताहन देईल. त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी, आर्थिक मदत तसेच नियोजन यासाठी एक मंच तयार करण्यात येईल. हा मंच देखील स्टार्ट अपद्वारेच बनवण्यात येईल.

कॅपिटल गेन्सवर सूटीचा कालावधीत वाढ –

स्टार्ट अपने फंडातून जमवलेल्या पैशाची कर विभाग तपासणी करणार नाही. सरकारने स्टार्टअपच्या विक्रीने होणाऱ्या कॅपिटल गेन्सवर सूटीचा कालावधी वाढवला आहे. स्टार्टअपला आपल्या बाजार मुल्याचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता भासणार नाही. देशातील स्टार्टअपला यातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

You might also like