विश्वशांतता प्रस्थापित करण्यासाठी युध्द नव्हे बुद्ध हवा – शिवाजीराव मखरे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जगाला शांततेचा संदेश देणारे विश्व शांतीदुत तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा समता आणि शांततेचा विचार या जगाला तारक ठरु शकतो. विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युध्द नव्हे तर बुद्ध हवा असल्याचे मत आर. पी. आय. पूणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांनी इंदापूर येथील आंबेडकरनगर जेतवन बुद्ध विहार येथे बोलताना व्यक्त केले.

शिवाजीराव मखरे हे इंदापूर- आंबेडकरनगर येथील सांस्कृतिक भवन येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. बुद्ध पोर्णीमा व जयंती निमीत्त सर्वप्रथम इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले व नंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांनी बुद्ध वंदना, त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन धम्मपुजा घेतली.

यावेळी आर. पी. आय. पूणे जिल्हा संघटक सचिव संघटक सचिव शिवाजीराव मखरे, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव माळुंजकर, बारामती लोकसभा मतदार संघ आर. पी. आय कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर. पी. आय. तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा. अशोक मखरे, बाळासाहेब मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, प्रा. बाळासाहेब मखरे, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष प्रा. सुहास मखरे, पुणे जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, ॲड. किरण लोंढे, सुरज मखरे, पी. आर. पी. चे शहराध्यक्ष शिवाजी मखरे, आनंद मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग युवक तालुकाध्यक्ष शुभम मखरे, प्रा. मयूर मखरे, मुख्याध्यापक शशिकांत मखरे, विनय मखरे, सुहास मखरे, अनिल साबळे, मुकादम बापुराव मखरे, विकास साबळे, वसिम बागवान इत्यादी उपस्थित होते.