मोदी सरकारने पाळले वचन ; अंतरिम अर्थसंकल्पात दिलेली ‘कर सवलत’ जशीच्या तशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्रालयाने वेगवेगळ्या मंत्रालयाला आणि विभागांना अंतरिम अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या कर सवलतीत तसेच इतर मदतीमधील सवलती चालू वित्तीय वर्षासाठी पूर्ण अर्थसंकल्पात तशीच सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत ५ जुलै रोजी सादर केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे अर्थमंत्रालयाने फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आता नवीन सरकारची स्थापना झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ५ जुलैला अर्थसंकल्प सादर करतील.

अंतरिम अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या कर सवलतीत कोणताही बदल नाही

अर्थमंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फक्त त्याच मुद्यांसाठी अतिरिक्त तरतूद असतील, ज्यांच्यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात देणे देण्यात आले नव्हते. अंतरिम अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये देण्यात आलेल्या तरतुदीमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

नवीन अर्थसंकल्प

सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाच्या टीममध्ये अर्थराज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ति सुब्रमण्यम यांचा समावेश असेल. फेब्रुवारी महिन्यात पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. आता नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवीन अर्थसंकल्प सादर करतील.