बॉलीवूडमधील ‘या’ ५ ‘लो-बजेट’ चित्रपटांची बॉक्स ऑफीसवर ‘धमाल’, कमवले कोट्यवधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोदी सरकारच्या दूसऱ्या पर्वात आज वित्त मंत्री निर्मला सीतारमण बजेट सांगणार आहे. बजेटचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर पडतच असतो. फिल्म इ़ंडस्ट्रीला देखील बजेटकडून खूप अपेक्षा आहे. आज बजेटच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही अशा चित्रपटांबद्दल माहिती सांगणार आहोत. जे चित्रपट कमी बजेटमध्ये बनले तर आहे मात्र त्यांनी बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटांनी सिद्ध केले की, चित्रपटाचे बजेट नाही तर त्याची कथा महत्वाची असते.

स्त्री
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘स्त्री’ ने मोठ्या पडद्यावर खूपच धमाल केली. ‘स्त्री’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८० कोटींची कमाई केली होती. या हॉरर कॉमेडी चित्रपटाला अमर कौशिक यानी डायरेक्ट केला होता. या चित्रपटामध्ये अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी आदी कलाकारांनी काम केले होते.

stree

बधाई हो
अभिनेता आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘बधाई हो’ने बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटाचे बजेट २९ कोटी होते पण चित्रपटाने २२१ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर शर्मा यांनी केले होते. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना व्यतिरिक्त सान्या मल्होत्रा, गजराज राव आणि नीना गुप्ता आदी कलाकारांनी काम केले आहे.

badhaai ho

अंधाधुन
आयुष्मान खुराना आणि राधिका आपटे यांचा ‘अंधाधुन’ चित्रपटाचे बजेट ३२ कोटी होते. या चित्रपटाचे वर्ल्ड वाइड कलेक्शन ४४१ कोटीपर्यंत पोहचले होते. चीनमध्ये या चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे. चीनमध्ये या चित्रपटाने ३३५ कोटीची कमाई केली होती. चित्रपटाला श्रीराम राघवनने डायरेक्ट केला होता. चित्रपटातमध्ये अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसून आली होती.

Andhadhun

राजी
बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्टचा चित्रपट ‘राजी’ चे एकूण बजेट ४० कोटी होते. या चित्रपटाने २०७ कोटींची कमाई केली होती. चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टने जासूसची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये आलियासोबत विक्की कौशल, रजित कपूर, जयदीप अहलावत, अमृता खानविलकर, सोनी राजदान आदी कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला मेघना गुलजार यांनी डायरेक्ट केला आहे.

raazi

तुंबाड
सोहम शाह यांनी चित्रपट ‘तुंबाड’ भयानक कथाची वेगळी शैली प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. या चित्रपटाचे बजेट ५ कोटी होते पण या चित्रपटाने १३ कोटींची कमाई केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंत केले. या चित्रपटाला राही अनिल यांनी डायरेक्ट केला होता.

तुम्बाड

वजन कमी करायचंय मग ‘कच्ची केळी’ खा

‘हे’ माहित आहे का ? काही वाईट सवयी आरोग्यासाठी असतात चांगल्या

‘हे’ पदार्थ आहेत मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शत्रू

दाभोलकर, पानसरे यांची हत्या म्हणजे मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी केलेले कृत्य – न्यायालय

घुसमट झाल्यामुळेच ‘वंचित’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने