Budget 2019: मोदी सरकारने केला शेतकऱ्यांचा घोर अपमान – राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये टाकण्याच्या निर्णयावरून राहुल गांधी यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिदिवस १७ रुपये देऊन त्यांचा घोर अपमान केला आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

शुक्रवारी हंगामी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे त्या अर्थसंकल्पात दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची रक्कम राहत म्हणून देण्याचा संकल्प केंद्र सरकारने सोडला आहे. त्याच घोषणेवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदींच्या अकार्यक्षम आणि उध्द्त सरकारने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आता या शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपयांची मदत देऊन सरकार त्या शेतकऱ्यांचा घोर अपमान करत आहे अशी टीका राहुल गांधी यांनी म्हणले आहे.

दुष्काळग्रस्त आणि नापिकीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दोन हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.